Join us

Virat Kohli Kishore Kumar : विराट कोहलीनं ५ वर्षांसाठी भाड्याने घेतला किशोर कुमार यांचा बंगला; बनवतोय रेस्टॉरंट!

किशोर कुमार यांचा मुंबईतील जुहू येथे एक बंगला आहे आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) त्याचं रुपडं बदलण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 15:04 IST

Open in App

बॉलिवूडचा दिग्गज गायक किशोर कुमार ( Kishore Kumar) यांनी सिनेसृष्टीला अनेक सदाबहार गाणी दिली. त्या गाण्यातून ते आजही रसिकप्रेक्षकांच्या मनात जीवंत आहेत. किशोर कुमार यांचा मुंबईतील जुहू येथे एक बंगला आहे आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) त्याचं रुपडं बदलण्याच्या तयारीत आहे. विराटने ५ वर्षांसाठी हा बंगला भाड्याने घेतला आहे आणि येथे तो लवकरच हाय ग्रेड रेस्टॉरंट सुरू करणार आहे. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार ( Amit Kumar) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीने जुहू येथील किशोर कुमार यांच्या बंगल्याच्या परिसरातील मोठा भाग भाड्याने घेतला आहे आणि येथे जोरात काम सुरू आहे. या जागी लवकरच एक मोठं रेस्टॉरंट उभं राहिलेलं पाहायला मिळणार आहे. अमित कुमार यांनी सांगितले की, विराट कोहलीच्या या नव्या प्रोजेक्टचं काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात याची सुरुवात होऊ शकते. लीना चंदावरकर यांचा मुलगा सुमित याची काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीशी भेट झाली होती आणि याच मुद्यावर तेव्हा चर्चा झाली होती. ही जागा विराटला ५ वर्षांसाठी भाड्याने दिली गेली आहे.  

किशोन कुमार यांनी चार लग्न केले आणि लीना चंदावरकर या त्यांच्या चौथ्या पत्नी आहेत. अमित कुमार हे पहिली पत्नी रुमा गुहा यांचा मुलगा आहे. किशोर कुमार यांच्याप्रमाणए अमितही पार्श्व गायक, अभिनेता व संगीत निर्देशक आहेत. विराट कोहलीनं दिल्लीत दोन रेस्टॉरंट खरेदी केले आहेत आणि अन्य प्रमुख शहरांमध्ये तो त्याच्या हॉटेल्सची चेन वाढवणार आहे. २०१७मध्ये त्याने पहिले रेस्टॉरंट उघडले होते.  

टॅग्स :विराट कोहलीकिशोर कुमारमुंबई
Open in App