भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यातील ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ३५.४ षटकांत सर्वबाद झाला आहे. सर्वजण मिळून केवळ १८८ धावांच करु शकले असून भारतीय गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर केलेला हा सर्वात कमी स्कोर आहे.
१८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपं नक्की नसणार आहे. कारण २१ षटकात भारताने ८७ धावा करत ५ विकेट्स गमावली आहे. आता केएल राहुल आणि रविंद्र जडेजा फलंदाजी करत असून ते भारताला सामना जिंकून देणार का?, हे काही वेळेने समोर येईलचं. मात्र त्याआधी विरोट कोहलीने क्षेत्ररक्षण करताना केलेला डान्स सध्या व्हायरल होत आहे.
कोहलीने 'नाटू नाटू' हुक स्टेपने मैदानात उपस्थित असणाऱ्या मुंबईकरांचे मनोरंजन केले. हे गाणं आहे, तेलगू भाषेतील अॅक्शन फिल्म RRRमधील आहे. या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून अनेक पुरस्कार जिंकले आहेत. तसेच विशेष म्हणजे ९५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू' या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉंग च्या कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे. या पुरस्कार सोहळ्यात गायक काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी स्टेजवर 'नाटू नाटू' हे गाणं गात प्रेक्षकांची दाद मिळवली.
दरम्यान, इशान किशन (३) मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर LBW झाला. मिचेल स्टार्कच्या तिसऱ्या षटकात शुबमन गिलचा झेल यष्टिरक्षक जॉश इंग्लिसने टाकला. पण, त्याची भरपाई विराट कोहलीची ( ४) विकेट घेऊन स्टार्कने केली. भारताला १६ धावांवर दुसरा धक्का बसला. पुढच्याच चेंडूवर स्टार्कने आणखी एक विकेट घेताना सूर्यकुमार यादवला भोपळ्यावर बाद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"