South Africa won the ODI series against India: दक्षिण आफ्रिकेत इतिहास घडविण्याच्या निर्धारानं दाखल झालेली टीम इंडिया सपशेल अपयशी ठरली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यंदा कसोटी मालिका जिंकून २९ वर्षांचा दुष्काळ संपवणार असा दावा केला गेला. पण, १-० अशी आघाडी घेऊनही टीम इंडियाला १-२ असा पराभव पत्करावा लागला. हा धक्का कमी होता की काय दक्षिण आफ्रिकेनं वन डे मालिकेतही २-० अशी आघाडी घेतली. आफ्रिकेच्या या विजयानं विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नावावरील पराक्रम अबाधित राहिला, परंतु २५ वर्षांनी त्यानं जे यश मिळवून दिलं होतं, ते या दौऱ्यात अवघ्या ३ दिवसांत गमावलं गेलं...
कसोटी मालिकेपाठोपाठ भारताला वन डे मालिकेतही यजमान दक्षिण आफ्रिकेनं पराभवाची चव चाखवली. आज पुन्हा एकदा फलंदाजांनी पाट्या टाकल्या. रिषभ पंत ( ८५) , लोकेश राहुल ( ५५) आणि शार्दूल ठाकूर ( ४०*) वगळता इतरांची कामगिरी समाधानकारक झाली नाही. शिखर धवन व आर अश्विन यांनी अनुक्रमे २९ व नाबाद २५ धावांचे योगदान दिले. भारतानं ६ बाद २८७ धावा केल्या. विराट कोहली भोपळाही फोडू शकला नाही.
गोलंदाजीत टीम इंडिया सपशेल अपयशी ठरली. भुवनेश्वर कुमारची लय पूर्णपणे बिघडलेली जाणवली. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज सहज धावा करताना दिसले. क्विंटन डी कॉक ( ७८) व येनमन मलान ( ९१) यांनी रचलेल्या भक्कम पायावर कर्णधार टेम्बा बवुमा ( ३५) ,एडन मार्कराम ( ३७*) व रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन ( ३७*) यांनी विजयी कळस चढवला. मलान व बवुमा पाठोपाठ बाद झाल्यानं भारतीयांच्या आशा उंचावल्या होत्या, परंतु गोलंदाजांना पुनरागमन करता आले नाही. आफ्रिकेनं हा सामना सहज जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
या निकालानंतर दक्षिण आफ्रिकेत वन डे मालिका जिंकणाऱ्या एकमेव भारतीय कर्णधाराचा मान हा विराट कोहलीकडेच राहिला. त्याच्या नेतृत्वाखाली २०१८मध्ये भारतानं ५-१ अशा फरकानं वन डे मालिका जिंकली होती. २५ वर्षांनंतर भारताला आफ्रिकेत वन डे मालिका जिंकता आली होती. १९९२-९३, २००६-०७, २०११ व २०१३ मध्ये भारतानं वन डे मालिका गमावल्या होत्या. आता २०२२मध्येही हाच निकाल लागला. (Virat Kohli is the only India captain to win an ODI series against SA in South Africa)
Web Title: Virat Kohli is still Only Indian Captain in the History Of Cricket to have Won ODI Series against South Africa in South Africa, Won by 5-1 margin
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.