विराट कोहलीने घेतली पाचव्या स्थानावर झेप, आयसीसीने जाहीर केली टी-२० क्रमवारी

याच मालिकेत दोनदा शून्यावर परतलेला भारतीय सलामीवीर लोकेश  राहुलला या क्रमवारीत फटका बसला. तो चौथ्या स्थानावर घसरला.  इंग्लंडचा डेव्हिड मलान अव्वलस्थानी कायम असून, त्याचे ८९४ गुण आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 03:53 AM2021-03-18T03:53:33+5:302021-03-18T07:28:54+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli jumps to fifth position, ICC announces T20 rankings | विराट कोहलीने घेतली पाचव्या स्थानावर झेप, आयसीसीने जाहीर केली टी-२० क्रमवारी

विराट कोहलीने घेतली पाचव्या स्थानावर झेप, आयसीसीने जाहीर केली टी-२० क्रमवारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथे सुरू असलेल्या टी-२० मालिकेत शानदार कामगिरीच्या जोरावर कर्णधार विराट कोहली याने फलंदाजांच्या आयसीसी  क्रमवारीत   पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचे ७४४  गुण झाले. एकदिवसीय क्रमवारीत विराट अव्वल तर  कसोटी क्रमवारीत पाचव्या  स्थानावर आहे. तिन्ही प्रकारांत तो अव्वल पाच फलंदाजांमध्ये असलेला विराट, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला.

याच मालिकेत दोनदा शून्यावर परतलेला भारतीय सलामीवीर लोकेश  राहुलला या क्रमवारीत फटका बसला. तो चौथ्या स्थानावर घसरला.  इंग्लंडचा डेव्हिड मलान अव्वलस्थानी कायम असून, त्याचे ८९४ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच दुसऱ्या तर पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या स्थानावर आहे.

भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० त नाबाद अर्धशतकी खेळी केलेला जोस बटलर या क्रमवारीत १९ व्या स्थानी आहे. त्याला पाच स्थानांचा लाभ झाला असून, तो याआधी २०१८ मध्ये १७ व्या स्थानी होता. अन्य भारतीय फलंदाजांमध्ये  श्रेयस अय्यर ३२ स्थानांची झेप घेत ३१ व्या क्रमांकावर पोहोचला. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत ८० व्या स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये वॉशिंग्टन सुंदर ११ व्या स्थानावर आला.
 

Web Title: Virat Kohli jumps to fifth position, ICC announces T20 rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.