Join us

ICC Ranking : विराट कोहली, कागिसो रबाडा यांनी गड राखला!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा यांनी कसोटी क्रमवारीतील सिंहासन कायम राखले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 14:26 IST

Open in App
ठळक मुद्देविराट कोहली 135 दिवस अव्वल स्थानावर कायम 2018 सालचा दणक्यात निरोपकागिसो रबाडाही टॉप

दुबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी ) कसोटी क्रमवारीतील सिंहासन कायम राखत 2018 सालचा निरोप घेतला. कोहलीने 931 गुणांसह फलंदाजांमध्ये, तर रबाडाने 880 गुणांसह गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान कायम राखले. अष्टपैलू खेळाडूंमध्ये बांगलादेशचा शकिब अल हसन ( 415) अग्रस्थानावर आहे.

मेलबर्न कसोटीत 82 धावांनी खेळी करूनही कोहलीच्या खात्यातील तीन गुण कमी झाले, परंतु त्याने दुसऱ्या स्थानावर असलेल्या केन विलियम्सनपेक्षा अधिक 34 गुणांनी अव्वल क्रमांक कायम राखला. कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या साऊदम्टन कसोटीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 937 गुणांची कमाई केली होती. भारतीयाने नोंदवलेला हा विक्रमच ठरला. कोहलीने 2018 मध्ये 1322 कसोटी धावा केल्या. ऑगस्ट महिन्यात कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्हन स्मिथला अव्वल स्थानावरून पायउतार केले. त्यानंतर आतापर्यंत 135 दिवस कोहली अव्वल क्रमांकावर आहे. रबाडा आणि इंग्लंडचा जेम्स अँडरसन यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस होती. मात्र, रबाडाने 6 गुणांच्या आघाडीसह बाजी मारली. यंदाच्या वर्षात अव्वल स्थान पटकावणारा रबाडा या युवा खेळाडू ठरला आहे. त्याने या वर्षात 178 दिवस हे स्थान अबाधित राखले आहे. त्याने 10 सामन्यांत 52 विकेट घेतल्या आहेत.  भारताच्या चेतेश्वर पुजाराने मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावातील शतकानंतर क्रमवारीत चौथे स्थान कायम राखले आहे, यष्टिरक्षक रिषभ पंतने 10 स्थानांनी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम 38वे स्थान पटकावले. पदार्पणात छाप पाडणाऱ्या मयांक अग्रवाल 67 व्या स्थानावर आला आहे.  

टॅग्स :विराट कोहलीआयसीसी