Virat Kohli KL Rahul, Asia Cup 2022 IND vs AFG: अफगाणिस्तानच्या संघाविरूद्ध निव्वळ औपचारिक सामना खेळण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने धडाकेबाज फलंदाजी केली. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने विश्रांती घेतल्याने, कर्णधार लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी सलामीला उतरण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा हा निर्णय एकदम 'हिट' ठरला. रोहितच्या अनुपस्थितीत विराट-राहुल जोडीने शतकी सलामी देत आपापली अर्धशतके पूर्ण केली. विराट कोहलीने आशिया चषकाच्या यंदाच्या हंगामात हाँगकाँग आणि पाकिस्ताननंतर आज तिसरे अर्धशतक ठोकले. तर फॉर्मसाठी झगडणाऱ्या लोकेश राहुलला देखील सूर गवसला. विराटच्या साथीने त्याने दमदार अर्धशतक ठोकत संघाला रोहितची उणीव अजिबात भासू दिली नाही.
--
दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आधीच आशिया चषक स्पर्धेतून बाहेर फेकले गेले असल्याने भारताने प्रयोग करण्याचा आणखी एक चान्स घेतला. रोहित शर्मा सोबतच हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहल यां दोघांनाही संघाबाहेर बसवण्यात आले. त्या जागी दिनेश कार्तिक, दीपक चहर आणि अक्षर पटेल या तिघांना संघात स्थान देण्यात आले.
भारत- लोकेश राहुल (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग
अफगाणिस्तान- हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान, नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनात, राशिद खान, अजमतुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, फजलहक फारुकी