पाकिस्तानच्या 'या' युवा खेळाडूनं तोडला कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड

जगभरात सर्वाधिक शतक बनवण्याचा विक्रम सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. त्यापाठोपाठ विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर आहे. पण कोहलीला तगडी स्पर्धा देण्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 08:21 PM2017-10-15T20:21:32+5:302017-10-15T20:51:24+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli Kohli's Virat Kohli broke the young batsmen's record | पाकिस्तानच्या 'या' युवा खेळाडूनं तोडला कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड

पाकिस्तानच्या 'या' युवा खेळाडूनं तोडला कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

युएई : पाकिस्तान म्हणजे हिंसा, दहशतवाद आणि अस्थिर वातावरण, असे चित्र पाहायला मिळते. २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर झालेला हल्ला माणुसकीला काळिमा फासणारा होता. सुदैवाने या हल्ल्यात क्रिकेटपटूंसह, पंच आणि सामनाधिकारी वाचले, मात्र या घटनेचे व्रण पुसले गेले नाहीत. या घटनेनंतर अन्य संघांनी पाकिस्तानचा दौरा करणे बंद केले. त्यानंतर आता तब्बल आठ वर्षानंतर पाकिस्तानचे क्रिक्रट विश्व आता पुन्हा मूळ पदावर येण्यास सुरूवात झाली आहे. सध्या युएईमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय सामने सुरू आहेत. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर पाकिस्तान संघाने विजय मिळवला आहे. पाकिस्तानच्या या विजयी कामगिरीप्रमाणेच या सामन्यात फलंदाज बाबर आजम याने दमदार शतक ठोकले आहे. जगभरात वेगवान शतक बनवण्याचा विक्रम सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. त्यापाठोपाठ विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर आहे. पण कोहलीला तगडी स्पर्धा देण्यासाठी बाबर आजम हा पाकिस्तानी फलंदाजही तयार आहे.

 दुबईत श्रीलंकेविरोधात खेळताना त्याने आपल्या एकदिवसीय क्रिकेट मधल्या ६ व्या शतकाला गवसणी घातली. त्याच्या 103 आणि मलिकच्या 81 धावांच्या जोरावर पाकिस्तानने लंकेचा ८३ धावांनी पराभव केला. या सामन्यात त्याने नंबर 3 च्या फलंदाजाकडून जशी फलंदाजी अपेक्षित होती अगदी त्याच पध्दतीने खेळत संघाची धावसंख्या 290 पर्यंत पोहचविण्यात मोलाचा वाटा उचलला. अगदी चौथ्या षटकांत मैदानावर उतरलेल्या आझमने एका बाजूने सावध खेळ केला. त्याने 131 चेंडूत 103  धावा केल्या, त्याचबरोबर 61 चेंडूत 81 धावा करत शोएब मलिकने त्याची साथ दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अवघे वय वर्ष 22 असताना ६ शतकं म्हणजे खूपच उल्लेखनीय आहे. विराटच्या दुप्पट वेगाने बाबर शतकांची खेळी करत आहे. बाबर आजमलादेखील क्रिक्रटचे फॅन्स पाकिस्तानचा विराट कोहली म्हणतात. 

22 वर्षीय बाबर आजमने 18 एकदिवसीय सामन्यांमध्ये 886 धावा केल्या आहेत. इतक्या कमी वयात हा धावांचा टप्पा पार करणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. 25 सामान्यांमध्ये 1306 धावा करण्याचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 धावा वेगवान धावादेखील बाबरनेच बनवल्या आहेत. लागोपाठ 3 वनडे शतक बनवणारा बाबर हा दुसरा युवा खेळाडू आहे. 


सर्वात जलद १००० धावा काढणारा पाकिस्तानी फलंदाज
२०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा बाबर आझम सर्वात जलद १००० धावा काढणारा पाकिस्तानी क्रिकेटर आहे. आझमने आत्तापर्यंतच्या त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ३२ सामन्यात ६ शतके व ६ अर्धशतकांच्या मदतीने १५५८ धावा काढल्या आहेत. यामध्ये ८७.६२ हे त्याचे स्ट्राईक रेट तर ५५.६४ ही त्याच सरासरी राहिली आहे.

Web Title: Virat Kohli Kohli's Virat Kohli broke the young batsmen's record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.