Join us  

स्टारडम इंडियात! परदेशात ट्रेनची वाट बघताना स्पॉट झाला विराट; व्हिडिओ व्हायरल

जे भारतात शक्य होत नाही ते परदेशात अगदी सहज करू शकतो विराट, म्हणून सारखा लंडन पळतोय तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 1:59 PM

Open in App

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली यूकेमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. विराट कोहलीची जी तुफान लोकप्रियता आहे, त्यामुळे त्याला भारतात एकदम बिनधास्त फिरता येत नाही. हीच कमी तो परदेशात भरून काढताना दिसतोय. 

परदेशातील रेल्वे स्टेशनवर स्पॉट झाला विराट

काही दिवसांपूर्वी लंडनमधील रस्त्यांवरून फेरफटका मारताना दिसलेल्या विराट कोहलीचा आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तो चक्क रेल्वे स्टेशनवर अगदी शांतपणे ट्रेनची वाट पाहताना दिसतोय. भारतात जी मोकळी सहजासहजी मिळत नाही ती त्याला परदेशात अगदी सहम मिळते. कदाचित त्यामुळेच तो सुट्टीच्या काळात परदेशात वेळ घालवण्याला पसंती देत असावा, असे या व्हिडिओतून दिसून येते. 

ग्रुप फोटोला राजी, मग रेल्वे स्टेशनच्या दिशेनं निघाली स्वारी

भारतीय स्टार क्रिकेटरचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात विराट कोहली आधी एका व्हॅनिटी व्हॅनमधून उतरल्याचे दिसते. यावेळी तो ग्रुपसोबत एक फोटो देण्यासाठीही तयार झाला. मग तो रेल्वे स्टेशनकडे जाताना दिसते. ट्रेन आल्यावर तो अगदी आरामात ट्रेनच्या दिशेनं चालताना दिसते. यावेळी विराट कोहलीचा लूक एकद कॅज्युअली होता. तपकीरी हुडी आणि काळ्या पँटसह त्याने स्नीकर्सला पसंती दिली होती.

श्रीलंका दौऱ्यावर ठरला होता फ्लॉप

विराट कोहली हा श्रीलंका दौऱ्यातील वनडे मालिकेत टीम इंडियाचा भाग होता. पण हा दौरा त्याच्यासाठी काही खास ठरला नाही. ३ सामन्यात त्याने २४, १४ आणि २० अशा धावा काढल्या. ही कामगिरी त्याच्या नावाला शोभणारी नाही.  या मालिकेनंतर बांगलादेश विरुद्धच्या सामन्याआधी तो दुलीप करंडक स्पर्धेत खेळणार, अशी चर्चा रंगली होती. पण या देशांतर्गत स्पर्धेत त्याला झुकतं माप मिळालं. त्यामुळे कोहली आता थेट बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतूनच क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. त्याआधी तो फॅमिलीसोबत परदेशात सुट्टीचा आनंद घेत आहे. या सुट्टीवरून भारतात परतल्यावर  क्रिकेट मैदानात धावांची बरसात करत तो चाहत्यांना आनंद देईल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघलंडन