भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यावेळी विराटच्या नावाची चर्चा होण्यामागे अजून एक नवे कारण समोर आले आहे. विराट कोहलीने २०१५ साली घेतलेली आलिशान लॅम्बॉर्गिनी कार सध्या एका वेबसाईटवर व्रिकीसाठी ठेवण्यात आली आहे. १.३५ कोटी रुपये इतकी कारची किंमत ठेवण्यात आली आहे. (virat kohli luxury Lamborghini for sale; You'll be amazed at the price)
ही कार २०१५ला घेतल्यानंतर काहीच वर्षे वापरून रॉयल ड्राईव्ह या कंपनीला विकली होती. विराटने ही कार केवळ १० हजार किलोमीटरच चालविली होती. त्यानंतर यावर्षी जानेवारी महिन्यात त्याने ही कार कोलकात्याच्या रॉयल ड्राईव्ह नावाच्या कंपनीला विकली होती. रॉयल ड्राईव्ह ही कंपनी महागड्या सेकंड हँड कार विकण्याचे काम करते. आता कंपनीकडून या गाडीच्या विक्रीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार ० ते १०० पर्यंतचा वेग अवघ्या चार सेकंदात धारण करु शकते. या गाडीच्या इलेक्ट्रोनिक लिमीटरचा वेग ३२४ किलेमीटर प्रतितास इतका आहे.
जगभरात कोहलीच्या चाहत्यांची काही कमी नाही. त्यामुळे विराटने वापरलेली ही कार विक्रीला काढल्यानंतर त्याला विराटच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू शकतो.