Join us  

...असं झाल्यास विराट कोहली महान फलंदाज विवियन रिचर्ड्स यांनाही टाकणार मागे

विराट कोहलीच्या तळपत्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत असून टी-20 मालिकेतही तो सुरु राहिला तर महान क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांचाही रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 12:38 PM

Open in App

मुंबई - दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय मालिकेत 5-1 ने पराभून केल्यानंतर पहिल्या टी-20 सामन्यातही भारताने विजय नोंदवला आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने एकहाती जिंकला आहे. संपुर्ण दौ-यात ज्या खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे तो म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली. विराट कोहलीच्या तळपत्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत असून टी-20 मालिकेतही तो सुरु राहिला तर महान क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांचाही रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे. विवियन रिचर्ड्स यांची बरोबरी करण्यासाठी विराटने टी-20 मालिकेत 156 धावा करण्याची गरज आहे.

दक्षिण आफ्रिकेविरोधातील सहा सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीने 186.00 च्या सरासरीने 558 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौ-यात (कसोटी आणि एकदिवसीय मालिका) आतापर्यंत एकूण 844 (558+ 286) धावा केल्या होत्या. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला असून विराट कोहली फक्त 26 धावा करु शकला आहे. विराटने तिन्ही सामन्यांत मिळून 156 धावा केल्यास त्याच्या दौ-यातील 1000 धावा पूर्ण होतील. यासोबतच कोणत्याही दौ-यात 1000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली क्रिकेटच्या इतिसाहासातील दुसरा फलंदाज ठरेल. याआधी हा भीमपराक्रम वेस्ट इंडिजचे स्फोटक फलंदाज विवियन रिचर्ड्स यांनी केला होता. जर विराटने याशिवाय अतिरिक्त 46 धावा केल्या तर मात्र तो विवियन रिचर्ड्स यांचाही रेकॉर्ड तोडेल.

वेस्टइंडिजचे महान फलंदाज विवियन रिचर्ड्स यांनी आपल्या पहिल्याच दौ-यात 1000 धावा करण्याचा पराक्रम केला होता. त्यांनी 1976 च्या इंग्लंड दौ-यात 1045 धावा केल्या होत्या. त्यांनी कसोटीमध्ये 829 आणि वन-डेमध्ये 216 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने 156 शिवाय अजून 46 धावा केल्या तर कोणत्याही दौ-यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार आहे. यासोबत विवियन रिचर्ड्स यांचा रेकॉर्ड तोडणारा खेळाहूही तो ठरणार आहे.  

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८