Join us  

"ख्रिस गेलला आम्ही 'जोकर' म्हणायचो...", किंग कोहलीने ड्रेसिंगरूममधील आठवणींना दिला उजाळा

Virat Kohli On Chris Gayle : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 4:13 PM

Open in App

Virat Kohli with Chris Gayle । बंगळुरू : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल (IPL 2023) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामाची सुरूवात 31 मार्चपासून होत आहे. ही बहुचर्चित स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) त्यांचे दोन खेळाडू ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांना हॉल ऑफ फेमने सन्मानित केले. यादरम्यान संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने या दोन दिग्गजांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. 

दरम्यान, ख्रिस गेल 2009 पासून 2021 पर्यंत आयपीएलच्या विविध संघाचा हिस्सा राहिला आहे. मात्र, युनिव्हर्सल बॉस गेलने त्याचे सर्वाधिक सामने आरसीबीकडून खेळले. आरसीबीच्या संघाकडून त्याने अनेक अविस्मरणीय खेळी खेळल्या. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या जर्सी लाँचच्या वेळी ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सचाही सन्मान करण्यात आला. या दोन्ही खेळाडूंचा आरसीबी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये या दोन्ही दिग्गजांना पदक देऊन गौरविण्यात आले. 

विराटने आठवणींना दिला उजाळा यादरम्यान संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने गेल आणि डिव्हिलियर्सबाबत एक मोठे विधान केले आहे. "इथे परत आल्याने खूप छान वाटत आहे. माझे दोन खास मित्र ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यासोबत इथे येणे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. आरसीबीकडून खेळताना मी या दोन सहकाऱ्यांच्या खूप जवळ आलो आहे", असे किंग कोहलीने सांगितले. 

गेलने नेहमी लोकांचे मनोरंजन केले - विराट कोहलीकोहलीने आणखी म्हटले, "मैदानात आम्ही अनेक संस्मरणीय क्षण अनुभवले. आम्ही ख्रिस गेलला ड्रेसिंगरूममध्ये जोकर म्हणायचो, कारण तो नेहमी विनोद करायचा आणि लोकांचे मनोरंजन करायचा. एबी डिव्हिलियर्सबद्दल काय बोलू, फक्त एवढेच सांगू शकतो की, मी त्याच्यावर खूप प्रेम करतो." खरं तर 2009 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून गेलने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तो 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला आणि 2017 पर्यंत आरसीबीचा भाग राहिला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

  

 

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरख्रिस गेलएबी डिव्हिलियर्स
Open in App