Virat Kohli Ruturaj Gaikwad, IPL 2022: 'आऊट ऑफ फॉर्म' ऋतुराज गायकवाडशी विराट कोहलीने मारल्या गप्पा; खांद्यावर हात टाकून दिला मित्रत्वाचा सल्ला (video)

ऋतुराजच्या पहिल्या पाच सामन्यात केवळ ३५ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 05:51 PM2022-04-13T17:51:23+5:302022-04-13T17:52:03+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli motivates out of form Ruturaj Gaikwad after CSK vs RCB clash video goes viral watch IPL 2022 | Virat Kohli Ruturaj Gaikwad, IPL 2022: 'आऊट ऑफ फॉर्म' ऋतुराज गायकवाडशी विराट कोहलीने मारल्या गप्पा; खांद्यावर हात टाकून दिला मित्रत्वाचा सल्ला (video)

Virat Kohli Ruturaj Gaikwad, IPL 2022: 'आऊट ऑफ फॉर्म' ऋतुराज गायकवाडशी विराट कोहलीने मारल्या गप्पा; खांद्यावर हात टाकून दिला मित्रत्वाचा सल्ला (video)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Ruturaj Gaikwad, IPL 2022 Video: क्रिकेटच्या मैदानात मंगळवारी क्रीडाप्रेमींनी एक अत्यंत हृदयस्पर्शी गोष्ट अनुभवली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. CSK ने देखील हा व्हिडीओ पोस्ट करत भावनिक झाल्याचे नमूद केले. डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या RCB vs CSK सामन्यात चेन्नईचा विजय झाला. पण ऋतुराज गायकवाड सलग पाचव्या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे लयीत परतण्यासाठी काय केलं पाहिजे? याबद्दल विराट कोहलीने त्याच्याशी आपुलकीने संवाद साधल्याचे दिसून आले.

गेल्या वर्षी ऑरेंज कॅप मिळवणारा आणि हंगामात तब्बल ६३५ धावा ठोकणारा मराठमोळा ऋतुराज गायकवाड सध्या काहीसा 'आऊट ऑफ फॉर्म' आहे. यावेळी ऋतुराजने पहिल्या पाच सामन्यांमध्ये केवळ ३५ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याचे नक्की काय चुकतेय, त्याने काय सुधारणा केली पाहिजे, याबद्दल किंग कोहलीने ऋतुराजशी आपुलकीने चर्चा केली आणि त्याला महत्त्वाच्या टिप्स दिल्या. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने सिनियर-ज्युनियर असा कोणताही भेद न बाळगता मित्रासारखा त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याच्याशी गप्पा मारल्या. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीला नक्कीच सुखावणारा होता.

दरम्यान, बंगलोर विरूद्धच्या सामन्यात चेन्नईकडून शिवम दुबे (नाबाद ९५) आणि रॉबिन उथप्पा (८८) यांनी तुफान खेळी केल्या आणि संघाला २१६ पर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगलोरच्या काही खेळाडूंनी छोटेखानी खेळी करत १९३ धावांपर्यंत मजल मारली. पण वरच्या फळीतील फलंदाजांचे अपयश आणि मोठ्या भागीदारीचा अभाव याचा फटका त्यांना बसला. त्यामुळे चेन्नईने बंगलोरवर २३ धावांनी मात केली.

Web Title: Virat Kohli motivates out of form Ruturaj Gaikwad after CSK vs RCB clash video goes viral watch IPL 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.