Join us  

तिस-या कसोटी सामन्यात 25 धावा करताच विराट कोहलीच्या नावे नोंद होणार नवा रेकॉर्ड

विराटने 62 कसोटी सामन्यांमध्ये 51.82 च्या सरासरीने 14 अर्धशतक आणि 19 शतकांच्या मदतीने 1975 धावा केल्या आहेत. पाच हजार धावा पुर्ण करण्यासाठी विराटला फक्त 25 धावांची गरज आहे. 25 धावा करताच विराट कोहलीन पाच हजार धावा करणारा 11 वा खेळाडू ठरणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 3:24 PM

Open in App
ठळक मुद्देपाच हजार धावा पुर्ण करण्यासाठी विराटला फक्त 25 धावांची गरज आहेविराटने 62 कसोटी सामन्यांमध्ये 51.82 च्या सरासरीने 14 अर्धशतक आणि 19 शतकांच्या मदतीने 4975 धावा केल्या आहेत 25 धावा करताच विराट कोहलीन पाच हजार धावा करणारा 11 वा खेळाडू ठरणार आहे

नवी दिल्ली - भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून एकदिवसीय आणि टी-20 सोबत कसोटीमध्येही नवनवे रेकॉर्ड करताना दिसत आहे. श्रीलंकेविरोधात दुस-या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून दुहेरी शतक ठोकत विराटने ब्रायन लाराच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. तिस-या कसोटी सामन्यातही अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची संधी विराट कोहलीकडे आहे. विराटने 62 कसोटी सामन्यांमध्ये 51.82 च्या सरासरीने 14 अर्धशतक आणि 19 शतकांच्या मदतीने 4975 धावा केल्या आहेत. पाच हजार धावा पुर्ण करण्यासाठी विराटला फक्त 25 धावांची गरज आहे. 25 धावा करताच विराट कोहलीन पाच हजार धावा करणारा 11 वा खेळाडू ठरणार आहे. 

अर्धशतकाचं रुपांतर शतकात करण्याचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्डही विराट कोहलीने मोडला आहे. सर्वात जलदगतीने पाच हजार धावा करण्याचा भारतीय विक्रम लिटिल मास्टर सुनील गावसकर यांच्या नावे आहेत. सुनील गावस्कर यांनी 52 सामन्यांमध्ये 95 डावात पाच हजार धावा केल्या होत्या. दुस-या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग आहे. सेहवागने 59 सामन्यांत 99 डावांमध्येच हा विक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने पाच हजार धावा पुर्ण करण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमॅन यांच्या नावे आहेत. त्यांनी फक्त 36 सामन्यांतील 56 डावांत हा पाच हजार धावांचा टप्पा पुर्ण केला होता. 

भारताने दुस-या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा एक डाव आणि 239 धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत भारताने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे ड्रॉ करण्याची नामुष्की ओढवली होती. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 2 डिसेंबरला दिल्लीमधील फिरोजशाह कोटला मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. 

दरम्यान विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पुढील महिन्यात मायदेशात खेळल्या जाणा-या वन-डे मालिकेत कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने स्पष्ट केले की, ‘विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहलीला वन-डे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.’ भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान सध्या तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. त्यानंतर धरमशाला येथे १० डिसेंबरपासून तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. वनडे मालिकेसाठी पंजाबचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलला संधी देण्यात आली आहे.

आणखी वाचा - भारतीय संघाचे हे आहेत कसोटीतील पाच विराट विजय

Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघक्रिकेट