कोहलीमध्ये खेळ सुधारण्याची भूक - गॅरी कर्स्टन

‘क्रिकेटमधील सर्वांत लोकप्रिय आणि महान खेळाडू कोण, हे चाहत्यांना विचाराल तर सहजपणे विराट कोहली याचे नाव अनेकांच्या ओठावर येते. कोहलीमध्ये ही महानता सहजासहजी आलेली नाही. स्वत:च्या खेळात सतत सुधारणा करण्याची त्याच्यात भूक दिसून येते. हीच महान खेळाडूची खरी ओळख आहे,’ असे मत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:59 AM2018-05-11T00:59:23+5:302018-05-11T00:59:23+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli News | कोहलीमध्ये खेळ सुधारण्याची भूक - गॅरी कर्स्टन

कोहलीमध्ये खेळ सुधारण्याची भूक - गॅरी कर्स्टन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - ‘क्रिकेटमधील सर्वांत लोकप्रिय आणि महान खेळाडू कोण, हे चाहत्यांना विचाराल तर सहजपणे विराट कोहली याचे नाव अनेकांच्या ओठावर येते. कोहलीमध्ये ही महानता सहजासहजी आलेली नाही. स्वत:च्या खेळात सतत सुधारणा करण्याची त्याच्यात भूक दिसून येते. हीच महान खेळाडूची खरी ओळख आहे,’ असे मत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय संघासोबत तीन वर्षांच्या यशस्वी कार्यकाळात विराटला कोचिंग देणारे कर्स्टन हे सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुसोबत सहायक प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहेत. २००८ ते २०११ या कालावधीत ते भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. वृत्तसंस्थेशी बोलताना कर्स्टन म्हणाले,‘ कोहली खेळात सतत सुधारणा करीत असल्याने दिवसेंदिवस त्याचा खेळ बहरत आहे. यामुळेच तो महान ठरतो. तो नेहमी खेळात सुधारणा करण्यास उत्सुक असल्याने मलादेखील त्याच्यासोबत काम करण्यास मजा येते. सर्वच महान खेळाडू पदोपदी खेळाचा विचार करीत असतात.’
इंग्लंड दौऱ्याआधी परिस्थितीशी ताळमेळ साधण्यासाठी कौंटी खेळण्याच्या कोहलीच्या निर्णयाचे कर्स्टन यांनी स्वागत केले आहे. याविषयी ते म्हणाले,‘कोहलीची इंंग्लंड दौºयासाठी तयारी करण्याची इच्छा आहे. तयारी कुठल्याही खेळाडूंसाठी चांगलीच असते.’ बुधवारी मायकेल क्लार्क याने कोहलीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करीत अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीला कोहलीने प्राधान्य द्यावे, असे मत मांडले होते. (वृत्तसंस्था)

भारत-इंग्लंड मालिका चुरशीची होईल, असे भाकीतही करीत कर्स्टन पुढे म्हणाले. ‘या मालिकेतील निकालाची मलादेखील उत्सुकता असेल.’ आयपीएलमध्ये प्रतिभावान खेळाडू पाहून मी प्रभावित झालो. या लीगची भारतीय क्रिकेटच्या विकासात मोठी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. आयपीएल भारतीय क्रिकेटला आकार दोण्यात मोलाची भूमिका बजावित असल्याचे कर्स्टन म्हणाले.

कर्स्टन यांनी पुण्यात नुकतीच अकादमी सुरू केली आहे. या सहा शहरातील प्रत्येकी सहा असे ३६ खेळाडू सराव करतील. या खेळाडूंना शिष्यवृत्ती देखील मिळेल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Virat Kohli News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.