नवी दिल्ली : माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याला विराट कोहली हा ‘मुत्सद्दी कर्णधार’ वाटत नाही. आयपीएल संदर्भात त्याची तुलना भारताचा माजी कर्कणधार महेंद्रसिंह धोनी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्मासोबत करता येणार नाही असे त्याने म्हटले आहे.धोनी व रोहित यांच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जने आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी तीन वेळा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये जेतेपद पटकावले आहे. मात्र कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकदाही आयपीएल जिंकू शकलेले नाही अशी तुलना त्याने केली आहे.आपल्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) २०१२ व २०१४ मध्ये जेतेपद पटकावून देणाऱ्या गंभीरने कोहली नशिबवान असल्याचे म्हटले आहे. कारण कर्णधार म्हणून त्याला गेल्या आठ वर्षांत संघाला जेतेपद पटकावून देता आले नाही तरी तो रॉयल चॅलेंजर्स सोबत कायम आहे. गंभीर म्हणाला,‘मी त्याला मुत्सद्दी कर्णधार मानत नाही. कारण त्याने आयपीएल जिंकलेले नाही. कामगिरी चांगली असलेला कर्णधारच चांगला कर्णधार ठरू शकतो.’आॅस्ट्रेलियात भारताला कसोटी मालिका जिंकून देणारा कोहली पहिला कर्णधार ठरला आहे. गंभीर म्हणाला,‘आयपीएलमध्ये असे कर्णधार आहे की, ज्यांनी संघाला तीनदा जेतेपद मिळवून दिलेले आहे. त्यामुळे कोहलीला अजुनही मोठी वाटचाल करायची आहे, असे वाटते.तुम्हाला याबाबत त्याची तुलना रोहित किंवा धोनीसोबत करता येणार नाही.’ गंभीर म्हणाला, ‘ गेल्या सात- आठ वर्षांपासून तो आरसीबीचाकर्णधार आहे. फ्रँचायसीने त्याला कायम राखले त्यामुळे त्याने त्यांचे आभार मानायला हवे.’ कारण स्पर्धा न जिंकणाऱ्या कर्णधारांना एवढा प्रदीर्घ कालावधी मिळत नाही.’(वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विराट कोहली हा ‘मुत्सद्दी कर्णधार’ नाही - गौतम गंभीर
विराट कोहली हा ‘मुत्सद्दी कर्णधार’ नाही - गौतम गंभीर
माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याला विराट कोहली हा ‘मुत्सद्दी कर्णधार’ वाटत नाही. आयपीएल संदर्भात त्याची तुलना भारताचा माजी कर्कणधार महेंद्रसिंह धोनी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्मासोबत करता येणार नाही असे त्याने म्हटले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 2:18 AM