नवी दिल्ली : सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा भन्नाट फॉर्मात आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो अव्वल फलंदाज ठरत आहे. त्यामुळेच कोहली हा माणूस आहे की रनमशिन असा प्रश्न काही जणांच्या मनात आला होता. या प्रश्नाला एका क्रिकेटपटूने वाट मोकळी करून दिली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने शतक झळकावले होते. एकदिवसीय क्रिकेटमधले त्याचे हे 36वे शतक होते. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात जर त्याने शतक पूर्ण केले तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा मैलाचा दगड त्याला गाठता येणार आहे. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 259 डाव लागले होते, तर कोहलीने आतापर्यंच 204 डावांमध्ये फलंदाजी केली आहे.
आतापर्यंत कोहलीने धडाकेबाज फलंदाजी केली आहे. त्यामुळेच कोहली हा माणूस नाही, असे वक्तव्य बांगलादेशचा फलंदाज तमीम इक्बालने केले आहे.