Join us  

विराट कोहली 'सनकी', लक्ष्य साध्य होईपर्यंत थांबतच नाही; माजी सहकाऱ्याचा दावा 

विराट कोहली ( Virat Kohli) याच्या बाबतीत रोज नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. जागतिक अजिंक्यपद कसोटी फायनलमधील पराभवानंतर टीम ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 4:28 PM

Open in App

विराट कोहली ( Virat Kohli) याच्या बाबतीत रोज नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. जागतिक अजिंक्यपद कसोटी फायनलमधील पराभवानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत आणि त्यांच्या केंद्रस्थानी कर्णधार कोहली आहे. त्याचं सहकाऱ्यांसोबत वागणं हे नीट नसल्याच्या बातम्याची झळकल्या. काही वरिष्ठ खेळाडूंनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे विराटची तक्रार केल्याचेही वृत्त धडकले. त्यात आता विराटच्या माजी सहकाऱ्यानंच त्याला सनकी म्हटलं आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कधीकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाचा सदस्य असलेल्या डेव्हिड वीजनं ( David Wiese) हे विधान केलं आहे.  

दक्षिण आफ्रिकेचा हा माजी क्रिकेटपटू आता नामिबिया संघाकडून खेळणार आहे. त्यानं विराट कोहलीला सनकी म्हटलं. तो म्हणाला,''लक्ष्य गाठण्यासाठी विराट कोहलीवर भूत संचार झालेला आसतो. त्याला जगात बेस्ट बनायचं आहे आणि जोपर्यंत तो हे लक्ष्य पूर्ण करणार नाही, तोपर्यंत तो ऐकत नाही. विराटमध्ये ही चांगली क्वालिटी आहे. तो आताच महान क्रिकेटपटू बनला आहे. एवढा मोठा फलंदाज असूनही तो तासंतास सराव करतो.''

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत डेव्हिड नामिबिया संघाकडून खेळणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नामिबियाला अ गटात स्थान दिले गेले आहे. डेव्हिडनं आज यूएईविरुरद्ध झालेल्या सामन्यातून नामिबियाकडून पदार्पण केलं. त्यात त्यानं १० धावा केल्या व १ विकेटही घेतली. नामिबियाने या सामन्यात १७ धावांनी विजय मिळवला.  डेव्हिडनं २०१६साली दक्षिण आफ्रिकेचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये प्रतिनिधित्व केले होते. 

 

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App