Join us  

कोहलीला वन-डे सामन्यांत विश्रांती, श्रीलंकेविरुद्धची तिसरी कसोटी व मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघ जाहीर

भारतीय कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे; पण तो नवी दिल्ली येथे खेळल्या जाणा-या तिस-या कसोटीत खेळणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 2:22 AM

Open in App

नागपूर : भारतीय कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे; पण तो नवी दिल्ली येथे खेळल्या जाणा-या तिस-या कसोटीत खेळणार आहे.पुढील महिन्यात मायदेशात खेळल्या जाणा-या वन-डे मालिकेत कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.बीसीसीआयने स्पष्ट केले की, ‘विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहलीला वन-डे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.’भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान सध्या तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. त्यानंतर धरमशाला येथे १० डिसेंबरपासून तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. वनडे मालिकेसाठी पंजाबचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलला संधी देण्यात आली आहे.तिसरा व अखेरचा कसोटी सामना २ डिसेंबरपासून दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.भारत संघ :तिसरी कसोटी :-विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धीमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा व विजय शंकर.वन-डे मालिका :- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार व सिद्धार्थ कौल.

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेट