टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होत असलेल्या 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत आपल्या बॅटचा तडाखा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत विराट कोहली महान क्रिकेटपटू रिकी पाँटिंगचा विक्रमही मोडू शकतो. विराट कोहली त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला, तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत धावा करू शकतो. कारण विराटची बॅट ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर जबरदस्त धावा जमवते.
विराट पाँटिंगचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर -
सध्या जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत 350 धावा करून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडू शकतो. विराट कोहलीने आणखी 350 धावा केल्या तर तो रिकी पाँटिंगला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येईल.
विराट कोहली 350 धावा बनवताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,484 धावा पूर्ण करेल. या बाबतीत तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकेल. पाँटिंगच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,483 धावा आहेत. तर सध्या विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,143 धावा आहेत.
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणारे फलंदाज -
- सचिन तेंडुलकर (भारत) – 34357 धावा
- कुमार संगकारा (श्रीलंका) – 28016 धावा
- रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 27483 धावा
- विराट कोहली (भारत) – 27134 धावा
- महेला जयवर्धने (श्रीलंका) – 25957 धावा
- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 25534 धावा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके -
- सचिन तेंडुलकर (भारत) - 100 शतके
- विराट कोहली (भारत) – 80 शतके
- रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 71 शतके
- कुमार संगकारा (श्रीलंका) – 63 शतके
- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 62 शतके
Web Title: Virat Kohli on the brink of breaking Ricky Ponting's world record in international cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.