Join us  

विराट कोहलीने पुन्हा एकदा घेतली हार्दिक पंड्याची बाजू, म्हणाला...

ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावरही कोहलीने पुन्हा एकदा पंड्याची बाजू घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 7:54 PM

Open in App

नेपीयर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल हे सध्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये केलेल्या विधानांमुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्या विधानांचा बऱ्याच जणांनी निषेध केला आहे. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने मात्र दुसऱ्यांदा पंड्याची बाजू लावून धरली आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ किवींच्या देशात पाच वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. बुधवारपासून दोन देशांमधील वन डे मालिकेला सुरुवात होणार असून आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या अनुपस्थितीत कोहली कोणत्या शिलेदारांसह मैदानात उतरेल हे पाहणे उत्सुकतेचे आहे. पांड्या व राहुल यांच्या जागी संघात विजय शंकर व शुभमन गिल यांचा समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी एकदा कोहलीने पंड्याची बाजू घेतली होती. पण त्यावेळी कोहलीच्या विधानावर बीसीसीआयने कोणतीही भूमिका व्यक्त केली नव्हती. ऑस्ट्रेलियामध्ये कोहली पंड्याबाबत म्हणाला होता की, " पंड्याने जे काही वक्तव्य केले ते त्याचे वैयक्तिक आहे. त्याच्या या वक्तव्याचा आणि संघाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात यावे." 

ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावरही कोहलीने पुन्हा एकदा पंड्याची बाजू घेतली आहे. कोहली म्हणाला की, " संघात हार्दिर पंड्यासारखा अष्टपैलू खेळाडू असेल तर दोन वेगवान गोलंदाजांनिशी आम्ही मैदानात उतरू शकतो. पण जर तो नसेल तर आम्हाला तीन वेगवान गोलंदाज संघात घ्यावे लागतात. या गोष्टीमुळे कुठेतरी संघाचे नुकसान होते. त्यामुळे जर पंड्या संघात असायला हवा. " 

टॅग्स :हार्दिक पांड्याविराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंड