Join us  

लंकेविरोधातील वन-डेसाठी विराटला विश्रांती, रोहित कर्णधार

श्रीलंकाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्य़ात आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 4:45 PM

Open in App

मुंबई - श्रीलंकाविरुद्धच्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्य़ात आली आहे. विराटच्या अनुपस्थितीत संघाची धुरा मुंबईकर रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय सामन्यांसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली.

सिद्धार्थ कौल आणि श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली. लंकेविराधात उर्वरीत एका कसोटीसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून यामध्ये फारसे बदल करण्यात आले नाहीत. यामध्ये शिखर धवनची निवड करण्यात आली. 

विराट कोहली आयपीएलपासून सलग क्रिकेट खेळत असल्यामुळे  दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वपूर्ण दौऱ्या अगोदर त्याला विश्रांती देण्यात आली आहे. कसोटी मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी कोणत्याही मालिकेच्या तयारीसाठी किमान एका महिन्याचा वेळ मिळायला हवा. पण तो मिळत नाही. कोणताही पर्याय नसल्यामुळे अपुऱ्या तयारीने मैदानात उतरावे लागते. याचा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो. असे सांगत विराटने बीसीसीआयच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  

श्रीलंकेविरोधातील वन-डे साठी भारतीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, धोनी(विकेटकिपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप, चहल, बुमराह, भुवनेश्वर, सिद्धार्थ कौल

उर्वरीत एका कसोटीसाठी संघ - विराट कोहली (कर्णधार), विजय, राहुल. शिखर, पुजारा, रहाणे(उपकर्णधार), रोहित, सहा(विकेटकिपर), अश्विन, जाडेजा, कुलदीप, शामी, उमेश, इशांत, विजय शंकर 

 

 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयरोहित शर्मा