Virat Kohli vs Babar Azam, Kane Williamson: भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्याबाबत वारंवार चर्चा होत असतात. अनेकदा लोक दोघांची तुलना करतात. विराट कोहलीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर बाबर आझमने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. या दोघांपैकी एक निवडण्याची वेळ जर तुमच्यावर आली तर तुमचीही नक्कीच धांदल उडेल. अगदी तसाच प्रसंग न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनवर ओढवला. विराट आणि बाबर दोन्ही खेळाडू उत्तम कव्हर ड्राइव्ह (Cover Drive) खेळतात. या दोघांच्या कव्हर ड्राईव्हबद्दल केन विल्यमसनला प्रश्न विचारण्यात आला.
दोघेही खेळात सर्वोत्तम आहेत असे सांगत न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू केन विल्यमसनने आपली निवड सांगितली. ईएसपीएन क्रिकइन्फोने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जेव्हा विल्यमसनला हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने आपली निवड स्पष्ट केली. विल्यमसनला विचारण्यात आले, "कोहली आणि बाबर यांच्यामध्ये कोण कव्हर ड्राइव्ह शॉट अधिक चांगला मारतो, तुझा आवडता कोण?" यावर विल्यमसनने उत्तर दिले की कोहलीचा कव्हर ड्राइव्ह मला अधिक आवडतो. त्याच्या या उत्तरानंतर आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन वैद्यकीय कारणांमुळे भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळू शकणार नाहीये. विल्यमसनची डॉक्टरांची नियोजित भेट आहे. विल्यमसनच्या जागी मार्क चॅपमनचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या अनुपस्थितीत वरिष्ठ वेगवान गोलंदाज टीम साऊदी संघाची धुरा सांभाळणार आहे. ऑकलंडमध्ये एकदिवसीय मालिकेसाठी सर्व खेळाडू एकत्र आल्यावर विल्यमसन बुधवारी संघात सामील होईल. पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी ईडन पार्कवर खेळला जाणार आहे.
Web Title: Virat Kohli or Babar Azam whose cover drive is best Kane Williamson gives this answer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.