Join us  

MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील आजचा सामना हा विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 5:52 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील आजचा सामना हा विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आयपीएलच्या या पर्वाची सुरुवात खराब झाल्यानंतर RCB ने सलग पाच सामने जिंकून स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत आणले. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा घरच्या मैदानावरील आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकून RCB ला प्ले ऑफचे तिकीट जिंकता येणार आहे. यंदाचे पर्व हे विराटने पुन्हा एकदा गाजवले आहे आणि १३ सामन्यांत ६६.१०च्या सरासरी व १५५.१६च्या स्ट्राईक रेटच्या जोरावर ६६१ धावांसह तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. त्यात १ शतक व ५ अर्धशतकांचा समावेश आहे.

 निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे. त्याने २५० सामन्यांत ७९२४ धावा केल्या आहेत. आयपीएलमधील सर्वाधिक ८ शतकंही त्यानेच झळकावली आहेत. ५५ अर्दशतकही त्याच्या नावावर आहेत. याशिवाय एकाच संघाकडून ( RCB) २५० आयपीएल सामने खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. पण, एवढं सर्व असूनही विराटला आयपीएल ट्रॉफीचा दुष्काळ संपवता आलेला नाही. ही एक खंत त्याला नेहमी सतावतेय आणि आज प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केल्यास RCB यंदा जेतेपद पटकावेल असा विश्वास चाहत्यांना आहे. कारण, यंदाच्या महिला प्रीमिअर लीगचे जेतेपद RCB च्या महिला संघाने स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली पटकावले आहे.

CSK vs RCB लढतीपूर्वी त्याने JioCinema ला मुलाखत दिली. त्यात तो म्हणाला, "एप्रिलमध्ये मी जवळजवळ माझी बॅग भरली होती आणि विचार केला होता की आता काय होईल? आणि आता आपण कुठे उभे आहोत ते बघा, हा खेळ कसा वळण घेतो हे आश्चर्यकारक आहे. ही गोष्ट अशी आहे की काहीतरी वेगळे होईल असे गृहीत धरू नये". 

यावेळी विराटला सहा खेळाडूंची नावे दिली गेली आणि त्यांच्यातील कोणतं कौशल्य घ्यायला आवडेल हे विचारले गेले... त्याची उत्तरं... 

 

  • महेंद्रसिंग धोनी- फिल्डिंग प्लेसमेंट
  • रोहित शर्मा- पूल शॉट
  • लोकेश राहुल - डाव्या हाताने झेल 
  • जसप्रीत बुमराह- यॉर्कर
  • हेनरिच क्लासेन - बॅकफूट सिक्स
  • रवींद्र जडेजा - चपळता 

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमहेंद्रसिंग धोनीऑफ द फिल्ड