विराट कोहलीमुळे 'ही' कसोटी जाणार? एका सत्रात सोडलेले चार झेल पडणार महागात

IND vs BAN : भारतीय संघाने या सामन्यावर चांगलीच पकड ठेवली होती आणि बांगलादेशचा संघ 100 धावांच्या आघाडीपूर्वीच ऑलआऊट होईल, असे वाटत होते. मात्र लिटन दासने भारतीय संघाच्या योजनेवर पाणी फेरले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 06:36 PM2022-12-24T18:36:22+5:302022-12-24T18:37:00+5:30

whatsapp join usJoin us
virat kohli poor fielding drops four catches in one session, IND vs BAN Test | विराट कोहलीमुळे 'ही' कसोटी जाणार? एका सत्रात सोडलेले चार झेल पडणार महागात

विराट कोहलीमुळे 'ही' कसोटी जाणार? एका सत्रात सोडलेले चार झेल पडणार महागात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि बांगलादेश (IND and BAN) यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस सुरू आहे. या कसोटीच्या सामन्यात भारताकडे 130 हून अधिक धावांची आघाडी आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खूप प्रयत्न केले, पण बांगलादेशचा फलंदाज लिटन दासला रोखता आले नाही. लिटन दासने 73 धावांची खेळी केली. भारतीय संघाने या सामन्यावर चांगलीच पकड ठेवली होती आणि बांगलादेशचा संघ 100 धावांच्या आघाडीपूर्वीच ऑलआऊट होईल, असे वाटत होते. मात्र लिटन दासने भारतीय संघाच्या योजनेवर पाणी फेरले.  

या सामन्यात लिटन दास बाद झाला नाही, कारण त्यात विराट कोहलीचाही हात होता. ही कसोटी मालिका विराटसाठी काही खास नव्हती, अशा स्थितीत क्षेत्ररक्षणातही विराटचे नाणे बोलू शकले नाही आणि या क्रिकेटपटूने एकापाठोपाठ एक 4 झेल सोडले. याचाच परिणाम म्हणजे लिटन दासची एवढी मोठी धावसंख्या ठरली. विराटचे हे चार झेल खूपच सोपे होते.

अक्षरच्या ओव्हरमध्ये सुटला झेल
52 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विराटने सर्वात आधी नुरुल हसनचा झेल सोडला. यावेळी विराट स्लिपला उभा होता, बॅटला लागून चेंडू विराटकडे गेला, पण विराटला तो झेल आला नाही आणि त्याने तो सोडला. यानंतर या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरही असाच प्रकार घडला आणि विराट पुन्हा एकदा स्लिपला उभा राहिला. विराटने तेही झेल सोडला. यावेळी विराटला वाटले झेल घेतला, पण रिव्ह्यूमध्ये चेंडू जमिनीवर आदळल्याचे स्पष्टपणे दिसले आणि अंपायरने नॉट आऊट दिला.

अश्विनच्या चेंडूवरही सोडला झेल
विराट कोहलीकडून झेल ड्राप करणे इथेच थांबले नाही, तर 59व्या षटकात विराटने पुन्हा एकदा अश्विनच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेल सोडला. यावेळी फलंदाज लिटन दासचा झेल होता. दरम्यान, अशा प्रकारे लिटल दासला जीवनदान मिळाले आणि त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. विराटने हा झेल घेतला असता तर दास अर्धशतक न करताच पॅव्हेलियनमध्ये परतला असता, पण तसे होऊ शकले नाही.

Web Title: virat kohli poor fielding drops four catches in one session, IND vs BAN Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.