भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या घरी बुधवारी एक दुःखद घटना घडली. बुधवारी सकाळी त्याचा लाडका कुत्रा ब्रुनो याचे निधन झाले. कर्णधार कोहलीनं सोशल मीडियावर ब्रुनोचा फोटो पोस्ट केला आणि भावुक पोस्ट लिहिली. ब्रुनो 11 वर्ष कोहली याच्या कुटुंबाचा सदस्य होता.
''तुझ्या आत्म्याला शांती मिळो ब्रुनो... गेली 11 वर्ष तू आमच्यासोबत होतास, परंतु तुझ्यासोबतचं नातं आयुष्यभर सोबत राहील,'' अशी पोस्ट कोहलीनं लिहिली.
कोहलीनं अनेकदा ब्रुनोसाबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानं नुकतंच बंगळुरू येथील चार्ली Animal Rescue Centre मधून 15 कुत्र्यांना दत्तक घेतले होते.
कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री
अनुष्का शर्मानंही ब्रुनोला श्रद्धांजली वाहिली. तिनं ब्रुनो आणि कोहलीसोबतचा फोटो शेअर केला.
Virat Kohliचे चाहत्यांना आवाहन; क्रिती सॅनोन, सारा अली खान यांच्यासोबत तयार केला व्हिडीओ
कोरोना व्हायरसा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी लागली. त्यामुळे बऱ्याच सेलिब्रेटींना आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येत आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही आहे. पण, कोहली सोशल मीडियावरून चाहत्यांना वारंवार सरकारच्या नियमांचे पालन करा असे आवाहन करत आहे. सोमवारी त्यानं एक व्हिडीओ पोस्ट करून आणखी एक आवाहन केलं आहे. यावेळी त्याच्यासोबत क्रिती सॅनोन, सारा अली खान आणि आयुषमान खुराणा हे बॉलिवूड सेलिब्रेटीही आहेत.
कोरोना व्हायरस संबंधात सध्या फेक व्हिडीओ, मॅसेज सर्रास फॉरवर्ड केले जात आहेत. असे मॅसेज फॉरवर्ड करू नका, असे आवाहन या व्हिडीओतून करण्यात आले आहे. TikTok च्या 'Mat Kar Forward' या मोहीमेसाठी हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
Web Title: Virat Kohli posts emotional message as his dog passes away svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.