"पुढे जाऊन पुढच्या पिढीचे नेतृत्व कर...", 'शतकवीर' शुबमन गिलचे 'विराट' कौतुक

virat kohli on shubman gill : शुबमन गिलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 12:22 PM2023-05-16T12:22:50+5:302023-05-16T12:23:19+5:30

whatsapp join usJoin us
 Virat Kohli praises Shubman Gill of Gujarat Titans after his century against Sunrisers Hyderabad in IPL 2023 | "पुढे जाऊन पुढच्या पिढीचे नेतृत्व कर...", 'शतकवीर' शुबमन गिलचे 'विराट' कौतुक

"पुढे जाऊन पुढच्या पिढीचे नेतृत्व कर...", 'शतकवीर' शुबमन गिलचे 'विराट' कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

shubman gill ipl 2023 | मुंबई : भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने युवा खेळाडू शुबमन गिलचे तोंडभरून कौतुक केले आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात गिलने सनरायझर्स हैदराबादविरूद्ध शानदार शतक झळकावले. खरं तर आयपीएल २०२३ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ १८ गुणांसह आताच्या घडीला क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. गुजरातच्या संघाकडून यंदाच्या हंगामात शतक ठोकणारा गिल हा पहिला खेळाडू ठरला आहे. गिलच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्या शतकानंतर किंग कोहलीने युवा भारतीय खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

शुबमनने ५८ चेंडूत १०१ धावांची शानदार खेळी केली. याच खेळीच्या जोरावर गुजरातने ३४ धावांनी सामना आपल्या नावावर केला. १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने गिलने आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. विराट कोहलीने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत या अप्रतिम खेळीचे कौतुक करताना गिलमध्ये पुढच्या पिढीचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. विराटने गिलला टॅग करत लिहले, "जिथे क्षमता आहे तिथे गिल आहे. पुढे जा आणि पुढच्या पिढीचे नेतृत्व कर."

गुजरात टायटन्स Play Offs मध्ये; सनरायझर्स हैदराबादचे पॅक अप

शुबमन गिल यंदाच्या हंगामात शानदार फॉर्ममध्ये आहे. खासकरून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील त्याची खेळी सर्वांचे लक्ष वेधत आहे, येथे त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. तो आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर पहिल्या स्थानावर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आहे.

गुजरातची प्लेऑफमध्ये धडक
सनरायझर्स हैदराबादला नमवून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. काल हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने शुबमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर (१०१) निर्धारित २० षटकांत ९ बाद १८८ धावा केल्या. १८९ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या फलंदाजांना घाम फुटला अन् संघ केवळ १५४ धावा करू शकला. गतविजेत्यांनी ३४ धावांनी मोठा विजय मिळवून प्लेऑफमध्ये धडक मारली. 

 

Web Title:  Virat Kohli praises Shubman Gill of Gujarat Titans after his century against Sunrisers Hyderabad in IPL 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.