काय खेळाडू आहे राव! वृद्धिमानच्या 'सुपर शो'चं 'विराट' कौतुक; कोहलीकडून प्रेमाचा वर्षाव

Wriddhiman Saha, IPL 2023 : आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 04:58 PM2023-05-07T16:58:16+5:302023-05-07T16:58:55+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli praises Wriddhiman Saha of Gujarat Titans after his 43-ball 81 in gt vs lsg match in IPL 2023 | काय खेळाडू आहे राव! वृद्धिमानच्या 'सुपर शो'चं 'विराट' कौतुक; कोहलीकडून प्रेमाचा वर्षाव

काय खेळाडू आहे राव! वृद्धिमानच्या 'सुपर शो'चं 'विराट' कौतुक; कोहलीकडून प्रेमाचा वर्षाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

GT vs LSG Live Match । अहमदाबाद : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात आज दोन भावांमध्ये लढाई होत आहे. होय, कारण लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत कृणाल पांड्या लखनौच्या संघाची धुरा सांभाळत आहे, तर गतविजेता गुजरातचा संघ यंदा देखील हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात चमकदार कामगिरी करत आहे. आजच्या सामन्यासाठी कृणाल पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम पलंदाजीसाठी आलेल्या गुजरातचा सलामीवीर वृद्धिमान साहाने स्फोटक खेळी करून मैदान दणाणून सोडले. षटकार आणि चौकारांचा पाऊस करणाऱ्या साहाचे किंग कोहलीने देखील कौतुक केले आहे.

साहा ४३ चेंडूत ८१ धावांची अप्रतिम खेळी करून बाद झाला. आवेश खानच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात असलेला साहा सीमारेषेवर झेल बाद झाला. १० चौकार आणि ४ षटकार ठोकून त्याने १८८.३७च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. 

किंग कोहलीकडून 'विराट' कौतुक
वृद्धीमान साहाच्या स्फोटक खेळीने खुद्द विराट कोहली देखील प्रभावित झाला. त्याने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपल्या सहकारी खेळाडूचे कौतुक केले. "काय खेळाडू आहे, वृद्धिमान साहा", अशा शब्दांत किंग कोहलीने साहाच्या खेळीला दाद दिली. 

पांड्या बंधूमध्ये लढत 
आजचा सामना पांड्या बंधूंसाठी खूप खास आहे. कारण आयपीएलच्या इतिहासात प्रथमच दोन बंधू कर्णधाराच्या रूपात आमनेसामने आहेत. स्वप्न सत्यात उतरले असल्याचे कृणालने यावेळी सांगितले. तर आजचा दिवस भावनिक असून माझ्या वडिलांना अभिमान वाटत असेल, असे हार्दिक पांड्याने सांगितले आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. जवळपास सर्वच संघांनी दहा ते अकरा सामने खेळले असून गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गतविजेता गुजरातचा संघ १४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर ११ गुणांसह लखनौचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. लखनौच्या संघाला मागील सामन्यात पावसामुळे केवळ एक गुण मिळाला होता. कारण पावसाच्या व्यत्ययामुळे लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामना रद्द करावा लागला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 
 

Web Title: Virat Kohli praises Wriddhiman Saha of Gujarat Titans after his 43-ball 81 in gt vs lsg match in IPL 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.