Virat Kohli Press Conference : रोहित शर्माची ( Rohit Sharma) वन डे संघाचा कर्णधार म्हणून BCCIनं निवड केल्यापासून विराट कोहली ( Virat Kohli) नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात रोहितच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वन डे मालिका खेळण्यास विराट इच्छुक नसल्याच्याची बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे रोहित विरुद्ध विराट असा सामना सोशल मीडियावर पुन्हा रंगताना दिसला. BCCIच्या वेगवेगळ्या सुत्रांचा हवाला देऊन या बातम्या केल्या केल्या. या सर्व चर्चा सुरू असताना विराट कोहली आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी प्रसार माध्यमांना सामोरे जात आहे आणि यात तो रोहितसोबतच्या वादांच्या चर्चांवर काय बोलतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Virat Kohli Press Conference Live Updates:
- विराट कोहलीनं आपण वन डे मालिकेत खेळणार असल्याचे स्पष्ट सांगितले. तो म्हणाला, वन डे मालिकेसाठीच्या निवड प्रक्रियेत मी उपलब्ध आहे. माझ्या माहितीनुसार मी नेहमीच उपलब्ध होतो. मी वन डे मालिका खेळणार नाही अशा बातम्या लिहिल्या गेल्या... त्यांचे सूत्र हे विश्वासार्ह नाहीत. त्यामुळे मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा ज्यांनी या बातम्या लिहिल्या त्यांनाच तुम्ही विचारा
- निवड समितीतील पाच सदस्यांनी मला वन डे कर्णधारपदाबाबत त्यांचा निर्णय कळवला आणि मला तो निर्णय मान्य आहे. बैठकीनंतर आम्ही यावर चर्चा केली.
- मला टीम इंडियासाठी खेळण्यापासून कोणतीच गोष्ट दूर ठेऊ शकत नाही. बाहेर बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि त्या योग्य नाहीत. पण, मी मानसिकदृष्ट्या तयार आहे आणि दक्षिण आफ्रिकेत खेळण्यासाठी उत्सुक आहे.
- कसोटी मालिकेत रोहित शर्माची उणीव मला जाणवेल. इंग्लंड दौऱ्यावर त्यानं दमदार कामगिरी केली होती. रोहितच्या अनुपस्थितीत मयांक अग्रवालला त्याची छाप पाडण्याची संधी आहे. रवींद्र जडेजाची अनुपस्थिती हा मोठा धक्का आहे. तो लवकर बरा व्हावा या शुभेच्छा
भारताचा कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाळ, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्वीन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज; राखीव - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्झान नगवास्वाला
भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रकपहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियनदुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्गतिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन