Join us  

Virat Kohli Press Conference Live Updates: तू आता वन डे संघाचा कर्णधार नसशील; निवड समितीनं दीड तास आधी केलेल्या कॉलवर विराट कोहली प्रथमच बोलला

Virat Kohli Press Conference : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 1:43 PM

Open in App

Virat Kohli Press Conference : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केला. रोहित शर्मासोबत वादावर चालवलेल्या बातम्यांवर त्यानं सूत्रांची विश्वासार्हता तपासून घ्या, असा सल्ला मीडियाला दिला. त्यात त्यानं वन डे कर्णधारपदावरून बीसीसीआयन हटवण्याचा निर्णय त्याला कसा कळवला गेला हेही सांगितले. 

रोहित शर्माची ( Rohit Sharma) वन डे संघाचा कर्णधार म्हणून BCCIनं निवड केल्यापासून विराट कोहली ( Virat Kohli) नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात रोहितच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वन डे मालिका खेळण्यास विराट इच्छुक नसल्याच्याची बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे रोहित विरुद्ध विराट असा सामना सोशल मीडियावर पुन्हा रंगताना दिसला. BCCIच्या वेगवेगळ्या सुत्रांचा हवाला देऊन या बातम्या केल्या केल्या. या सर्व चर्चा सुरू असताना विराट कोहली आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी प्रसार माध्यमांना सामोरे जात आहे आणि यात तो रोहितसोबतच्या वादांच्या चर्चांवर काय बोलतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Virat Kohli Press Conference Live Updates: 

  • विराट कोहलीनं आपण वन डे मालिकेत खेळणार असल्याचे स्पष्ट सांगितले. तो म्हणाला, वन डे मालिकेसाठीच्या निवड प्रक्रियेत मी उपलब्ध आहे. माझ्या माहितीनुसार मी नेहमीच उपलब्ध होतो. मी वन डे मालिका खेळणार नाही अशा बातम्या लिहिल्या गेल्या... त्यांचे सूत्र हे विश्वासार्ह नाहीत. त्यामुळे मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा ज्यांनी या बातम्या लिहिल्या त्यांनाच तुम्ही विचारा 
  • मला टीम इंडियासाठी खेळण्यापासून कोणतीच गोष्ट दूर ठेऊ शकत नाही. बाहेर बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि त्या योग्य नाहीत. पण, मी मानसिकदृष्ट्या तयार आहे आणि दक्षिण आफ्रिकेत खेळण्यासाठी उत्सुक आहे.
  • कसोटी मालिकेत रोहित शर्माची उणीव मला जाणवेल. इंग्लंड दौऱ्यावर त्यानं दमदार कामगिरी केली होती. रोहितच्या अनुपस्थितीत मयांक अग्रवालला  त्याची छाप पाडण्याची संधी आहे. रवींद्र जडेजाची अनुपस्थिती हा मोठा धक्का आहे. तो लवकर बरा व्हावा या शुभेच्छा... 

 

कसोटी संघ जाहीर करण्यापूर्वी दीड तास आधी आला कॉल अन्...ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडताना वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व करणार असल्याचे विराटनं स्पष्ट केले होते. तरीही निवड समितिनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी रोहित शर्मा वन डे संघाचा कर्णधार असेल हे जाहीर केले.

यावर विराट म्हणाला, निवड समितीतील पाच सदस्यांनी मला वन डे कर्णधारपदाबाबत त्यांचा निर्णय कळवला आणि मला तो निर्णय मान्य आहे. बैठकीनंतर आम्ही यावर चर्चा केली.  कसोटी संघ निवडण्याआधी निवड समितीची बैठक होण्यापूर्वी मला दीड तास आधी कॉल आला. निवड समिती प्रमुखांनी कसोटी संघाबाबत माझ्याशी चर्चा केली. तो कॉल संपण्यापूर्वी निवड समितीनं मला वन डे कर्णधारपदावर तू नसशील असे सांगितले आणि मी त्यांचा निर्णय मान्य केला. त्याआधी या विषयावर चर्चा झाली नाही. 'वन डे संघाच्या कर्णधारपदावर कायम राहणार असल्याच्या माझ्या निर्णयावर चर्चा केली होती. कर्णधार म्हणून मी माझी जबाबदारी  प्रामाणिकपणे पार पाडली.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीबीसीसीआयरोहित शर्मा
Open in App