Virat Kohli Press Conference : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केला. रोहित शर्माची ( Rohit Sharma) वन डे संघाचा कर्णधार म्हणून BCCIनं निवड केल्यापासून विराट कोहली ( Virat Kohli) नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात रोहितच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वन डे मालिका खेळण्यास विराट इच्छुक नसल्याच्याची बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे रोहित विरुद्ध विराट असा सामना सोशल मीडियावर पुन्हा रंगताना दिसला. BCCIच्या वेगवेगळ्या सुत्रांचा हवाला देऊन या बातम्या केल्या केल्या. रोहितसोबतच्या वादांवर यावेळी विराट कोहलीनं त्याचं मत व्यक्त केलं.
Virat Kohli Press Conference Live Updates:
विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यातल्या वादाच्या चर्चा याआधीही अनेकदा रंगल्या. दोघांनी मीडियासमोर असे वाद नसल्याचे सांगितले असले तरी संघातील वातावरण काही वेगळंच सांगतंय. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात विराटनं बीसीसीआयकडे विनंती करताना रोहितला उप कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी केली होती. रोहितच्या वयाचं कारण पुढे करून विराटनं ही मागणी केली होती. त्याला उप कर्णधारपदाची जबाबदारी युवा खेळाडूला द्यायची होती. पण, बीसीसीआयनं त्यावेळेस नकार दिला. आता तर नशिबानं अशी पलटी मारली की रोहित मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार झाला आहे आणि विराटला त्याच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे.
२०१८मध्येही दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा होती. ही दोघं सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत नसल्यावरून या दोघांमध्ये भांडण असल्याचा अंदाज लावला गेला. आता इंस्टाग्रामवर ही दोघं एकमेकांना फॉलो करत आहेत.विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिच्या एका पोस्टचा संबंध रोहित- विराट वादाशी लावला गेला. त्यात तिनं लिहिलं होतं की, बुद्धीमान व्यक्तीनं काहीच मत व्यक्त केलं नाही, सत्य हे असत्याच्या दिखाव्यामागे झाकोळून जात नाही.'
आता या नव्या वादावर विराट म्हणाला, माझ्यात आणि रोहित याच्यात काहीच वाद नाही. मी हे अडीच वर्षांपासून सांगतोय आणि आता मी हे सांगून सांगून थकलो आहे. मी संघाची मान खाली करण्यासाठी काहीच असं करणार नाही. माझ्यात आणि रोहितमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. ( Virat Kohli: Mere aur Rohit k beech mein kuch nahi hai. Mai 2.5 saal se yahi bol raha hu. Mai thak chuka hu bol bol ke. Mai jo bhi chahunga ya karunga wo team ko neeche karne ke liye nahi hoga. Mere aur Rohit k beech koi problem nahi hai.)
Web Title: Virat Kohli Press Conference Live Updates: nothing between me and Rohit Sharma, last 2.5 years i told that, Say Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.