Virat Kohli Press Conference Live Updates: विराट कोहलीनं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी घेतला पंगा; दादाला ठरवलं खोटारडा

Virat Kohli Press Conference : विराटनं आजच्या पत्रकार परिषदेत वन डे मालिका खेळण्यास उपलब्ध असल्याचे स्पष्ट करताना रोहित शर्मासोबतच्या संबंधांवरही स्पष्ट मत मांडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 02:09 PM2021-12-15T14:09:31+5:302021-12-15T14:09:52+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli Press Conference Live Updates: Virat Kohli said, "I wasn't told to not leave the T20i captaincy". | Virat Kohli Press Conference Live Updates: विराट कोहलीनं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी घेतला पंगा; दादाला ठरवलं खोटारडा

Virat Kohli Press Conference Live Updates: विराट कोहलीनं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी घेतला पंगा; दादाला ठरवलं खोटारडा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Press Conference : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केला. विराटनं आजच्या पत्रकार परिषदेत वन डे मालिका खेळण्यास उपलब्ध असल्याचे स्पष्ट करताना रोहित शर्मासोबतच्या संबंधांवरही स्पष्ट मत मांडले. त्याचवेळी त्यानं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्यावरही आपले मत मांडले. पण, ते मांडताना त्यानं थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्याशी पंगा घेतला. त्यानं माजी कर्णधाराला खोटारडा ठरवलं. 

Virat Kohli Press Conference Live Updates: 
 

रोहित शर्मासोबतच्या वादावर विराट म्हणाला, माझ्यात आणि रोहित याच्यात काहीच वाद नाही. मी हे अडीच वर्षांपासून सांगतोय आणि आता मी हे सांगून सांगून थकलो आहे. मी संघाची मान खाली करण्यासाठी काहीच असं करणार नाही. माझ्यात आणि रोहितमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही.  

सौरव गांगुली काय म्हणाला अन् विराट काय म्हणतोय?
 

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं रोहितच्या  वन डे संघाच्या कर्णधारपदावरील निवडीबाबत मौन सोडले. तो म्हणाला,''बीसीसीआय आणि निवड समितीनं मिळून हा निर्णय घेतला आहे. खरं सांगायचं तर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस ही विनंती बीसीसीआयनं विराटला केली होती. पण, त्यानं तेव्हा नकार दिला. त्यानंतर ट्वेंटी-२० व वन डे संघासाठी दोन वेगवेगळे कर्णधार नसावेत, अशी निवड समितीची भूमिका होती. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला.''

गांगुलीनं ९ डिसेंबरला सांगितलं होतं की, विराट कोहलीला ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस अशी विनंती मी केली होती आणि त्यानं ती नाही ऐकली.

 त्यावर विराट आज म्हणाला, कसोटी संघ निवडण्याआधी निवड समितीची बैठक होण्यापूर्वी मला दीड तास आधी कॉल आला. निवड समिती प्रमुखांनी कसोटी संघाबाबत माझ्याशी चर्चा केली. तो कॉल संपण्यापूर्वी निवड समितीनं मला वन डे कर्णधारपदावर तू नसशील असे सांगितले आणि मी त्यांचा निर्णय मान्य केला. त्याआधी या विषयावर चर्चा झाली नाही. मला कोणीही ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस, अशी विनंती केलेली नाही. BCCI कडून या निर्णयाबाबत माझ्याशी कुणीच चर्चा केली नाही . माझा निर्णय त्यांनी मान्य केला आणि हा काही गुन्हा नाही. ( "The first thing I did was to approach the BCCI to leave T20I captaincy. It was received really nicely, There was no offence. It was received as a progressive step, in the right direction" - Virat Kohli) 

Web Title: Virat Kohli Press Conference Live Updates: Virat Kohli said, "I wasn't told to not leave the T20i captaincy".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.