Join us  

विराट कोहलीला राजीव गांधी खेलरत्न, तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर

क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जात आहेत. यावर्षीच्या विविध क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 5:35 PM

Open in App
ठळक मुद्देराष्ट्रपती भवनात 25 सप्टेंबर 2018 रोजी होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि  महिला भारोत्तोलनपटू मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबतला यावेळी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जात आहेत. यावर्षीच्या विविध क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली.  राष्ट्रपती भवनात 25 सप्टेंबर 2018 रोजी होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

पुरस्काराचे स्वरुप असे आहे

साडे सात लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे स्वरुप आहे. अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जातील. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र दिले जाईल. आंतर विद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद चषक, 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाईल.

 

राहीशी केलेली ही खास बातचीत पाहा

 

हे पुरस्कार पुढील प्रमाणे:-

राजीव गांधी खेलरत्न-2018एस. मीराबाई चानू- भारोत्तोलनविराट कोहली- क्रिकेट

द्रोणाचार्य पुरस्कार– 2018सुभेदार चेनंदा अच्चय्या कुटप्पा– मुष्टियुद्धविजय शर्मा– भारोत्तोलनए. श्रीनिवास राव- टेबल टेनिससुखदेव सिंग पन्नू- धावपटूक्लॅरेन्स लोबो- हॉकी (जीवनगौरव)तारक सिन्हा- क्रिकेट (जीवनगौरव)जीवन कुमार शर्मा- ज्युडो ( जीवनगौरव)व्ही.आर.बीडू- धावपटू (जीवनगौरव)

अर्जुन पुरस्कार- 2018नीरज चोप्रा- भालाफेकपटूजीन्सन जॉनसन-धावपटूहीमा दास- धावपटूनेलाकुरथी सिक्की रेड्डी- बॅडमिंटनसतीश कुमार- मुष्टियुद्धस्मृती मानधना- क्रिकेटशुभंकर शर्मा- गोल्फमनप्रित सिंग-हॉकीसविता-हॉकीकर्नल रवी राठोड- पोलोराही सरनोबत- नेमबाजीअंकुर मित्तल- नेमबाजीश्रेयसी सिंग- नेमबाजीमनिका बत्रा- टेबल टेनिसजी. साथियन- टेबल टेनिसरोहन बोपन्ना- टेनिससुमित- कुस्तीपुजा कडियन- वुशूअंकूर धामा- पॅरा ॲथलिटिक्समनोज सरकार- पॅरा बॅडमिंटनध्यानचंद पुरस्कार- 2018सत्यदेव प्रसाद- तिरंदाजीभारत कुमार छेत्री- हॉकीबॉबी अलॉयसियस- धावपटूचौगले दादू दत्तात्रय- कुस्ती

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार- 2018उदयोन्मुख आणि युवा प्रतिभेची निवड आणि प्रोत्साहन- राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडकॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून खेळांना प्रोत्साहन- जेएसडब्ल्यू स्पोर्टस्

विकासासाठी खेळ- इशा आउटरीचमौलाना अबुल कलाम आजाद चषक 2017-18गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर

टॅग्स :विराट कोहलीराही सरनोबत