विशाखापट्टणम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाबाद 157 धावांची खेळी करताना भारताला 321 धावांचा पल्ला गाठून दिला. मात्र, विंडीजच्या शाय होपच्या ( नाबाद 123) फटकेबाजीमुळे हा सामना अनिर्णीत राहिला. होपने अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून सामना बरोबरीत सोडवला.
या सामन्यात
विराट कोहलीने 10000 धावांचा पल्ला पार केला. त्यानंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण त्याचवेळी विराटमुळेच हा सामना अनिर्णीत सुटल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
त्याचे झाले असे, भारतीय संघ फलंदाजीला मैदानावर उतरला असताना 11 व्या षटकात एक प्रसंग घडला. विराट आणि अंबाती रायुडु खेळपट्टीवर होते. अॅशले नर्सच्या षटकाच्या एका चेंडूवर विराटने डीप मिडविकेटला फटका मारला. त्याला दोन धावा घेण्याची संधी मिळाली. मात्र, दुसरी धाव घेताना विराट घाईघाईत पहिली धाव पूर्ण न करताच मागे फिरला. त्याने क्रिजवर बॅट टेकवलीच नाही. त्यामुळे भारताच्या खात्यात एक धाव कमी झाली आणि यजमानांना 321 धावांवर समाधान मानावे लागले.
ही एक धाव मिळाली असती तर भारत जिंकला असता, अशी चर्चा सुरू आहे.
पाहा व्हिडीओ...
Web Title: Virat Kohli ran one short And India tied the game, social media reaction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.