नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर विराटने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार धावा केल्यानंतर त्याने अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला चांगली फलंदाजी करता आली नव्हती. त्यामुळे त्याला अव्वल स्थान गमवावे लागले होते. पण त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात मात्र त्याने दोन्ही डावांत धडाकेबाज फलंदाजी केली आणि त्यामुळे त्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.
क्रमवारीतील अव्वल स्थान पटकावताना कोहलीने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथला पिछाडीवर टाकले आहे. स्मिथवर एका वर्षाची बंदी असली तरी त्याने आतापर्यंत केलेल्या फलंदाजीच्या जोरावर त्याने अव्वल स्थान पटकावले होते.