ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीचा ( Virat Kohli) फॉर्म सर्वांना अचंबित करणारा ठरतोय. मागील दोन-अडीच वर्ष विराटच्या बॅटीतून धावा निघत नव्हत्या आणि त्याच्यावर टीकाही झाली. पण, आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून त्याने पुनरागमनाचे संकेत दिले आणि ऑस्ट्रेलियात तर तो तुफान सुटलाय... विराटला ऑस्ट्रेलियात धावा करणे नेहमी आवडते आणि येथील आकडेही तेच सांगतात. पाकिस्तानविरुद्धची विराटची खेळी ही आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले गेले. विराट हा क्रिकेटमधील GOAT ( ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम) म्हणजेच सर्वकालीन महान खेळाडू असल्याचा दावा चाहत्यांकडून केला जातोय, परंतु विराटचे मत काही वेगळे आहे.
शोएब अख्तरने भारतीय संघाला दिला 'शाप'! म्हणाला, तुम्ही काय तीस मार खान नाही आहात, उद्या...
मेलबर्नवर झालेल्या सामन्यात १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे ४ फलंदाज ३१ धावांत माघारी परतले होते. तेव्हा विराटने संयमाने खेळ केला आणि ५३ चेंडूंत नाबाद ८२ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. स्टेडियमवर उपस्थित ९० हजारापेक्षा अधिक प्रेक्षकांसाठी विराटची खेळी संस्मरणीय ठरली. विराटच्या या खेळीनंतर पुन्हा एकदा GOAT यावर चर्चा सुरू झालीय. पण, विराटने स्वतःला GOAT म्हणण्यास इन्कार केला. त्याच्यासाठी केवळ दोनच खेळाडू GOAT आहेत.
विराट म्हणाला, मी स्वतःला क्रिकेटमधील GOAT समजत नाही. माझ्यासाठी या पदवीस दोनच खेळाडू पात्र आहेत. एक सचिन तेंडुलकर आणि दुसरे व्हीव्ह रिचर्ड्स...
पाकिस्तानला झोडल्यानंतर विराटची गरुड झेप...आयसीसीच्या ताज्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील क्रमवारीत विराटने मोठी झेप घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत ३५ व्या क्रमांकावर असलेला विराट आज ९व्या क्रमांकावर आला आहे. India vs Pakistan सामन्याआधी विराट १५व्या क्रमांकावर होता, परंतु त्याच्या नाबाद ८२ धावांच्या अविश्वसनीय खेळीने सारे चित्र बदलले. विराटची टॉप टेनमध्ये एट्री झाली. विराटचा हा फॉर्म असाच कायम राहिला तर तो टॉप फाईव्हमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान व बाबर आजम यांनाही टक्कर देऊ शकतो.
मोहम्मद रिझवान ८४९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दमदार खेळीच्या जोरावर थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. किवी फलंदाजाने भारताच्या सूर्यकुमार यादव (८२८) व पाकिस्तानचा कर्णधार बाबर ( ७९९) यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर ढकलले. विराटकडे ६३५ रेटिंग पॉईंट आहेत आणि त्याच्यापुढे श्रीलंकेचा पथूम निसंका ( ६५८), ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच ( ६८१), इंग्लंडचा डेवीड मलान ( ७५४) आणि आफ्रिकेचा एडन मार्कराम ( ७६२) हे आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"