दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहली सोमवारी जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नव्या कसोटी क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. त्याचवेळी, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. कोहली (९२८) आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथपेक्षा १७ गुणांनी आघाडीवर आहे. स्मिथने न्यूझीलंडविरुद्ध पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत ४३ व १६ धावा केल्या होत्या. आॅस्ट्रेलियाने या लढतीत २९६ धावांनी विजय मिळवला.चेतेश्वर पुजारा (७९१) व अजिंक्य रहाणे (७५९) अनुक्रमे चौथ्या व सहाव्या स्थानी कायम आहेत. आॅस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनची क्रमवारीत आगेकूच कायम आहे. न्यूझीलंडविरुद्ध पर्थ कसोटीत १४३ व ५० धावांची शानदार खेळी करणारा लाबुशेन तीन स्थानांच्या प्रगतीसह पाचव्या स्थानी दाखल झाला आहे. क्रमवारीत त्याने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला पिछाडीवर सोडले व तो स्मिथनंतर दुसरा सर्वोत्तम आॅस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे.श्रीलंकेविरुद्ध मायदेशातील पहिल्या कसोटीत नाबाद १०२ धावांची खेळी करणारा बाबर आझम प्रथमच अव्वल दहामध्ये दाखल झाला. टी२० क्रमवारीत अव्वल व एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला आझम कसोटी क्रमवारीत १३ वरुन नवव्या स्थानी दाखल झाला. इंग्लंडची माजी सलामीवीर (महिला) एनिड बेकवेलनंतर आपल्या पहिल्या एकदिवसीय व कसोटीत शतक झळकावणारा केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरलेल्या आबिद अलीने कसोटी क्रमवारीत ७८ व्या स्थानापासून सुरूवात केली. तो कारकिर्दीतील पहिल्या एकदिवसीय व पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा एकमेव पुरुष क्रिकेटपटू आहे.अष्टपैलू खेळाडूंच्या मानांकनामध्ये रवींद्र जडेजा वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरनंतर दुसºया स्थानी कायम आहे. भारतीय संघ आयसीसी कसोटी अजिंक्यपदमध्ये ३६० गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. त्यानंतर आॅस्ट्रेलिया (२१६), श्रीलंका (८०), न्यूझीलंड (६०) आणि इंग्लंड (५६) या संघांचा क्रमांक आहे.मिशेल स्टार्क, हेजलवूड यांची प्रगतीच्गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुखापतीमुळे मायदेशातीलमालिकेला मुकलेल्या बुमराहची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. या क्रमवारीमध्ये आॅस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल स्थानी आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीमध्ये सात बळी घेणारा न्यूझीलंडचा नील वॅगनर कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन ८३४ गुणांसह पुन्हा एकदा तिसºया स्थानी दाखल झाला आहे.च्सामन्यात ९ बळी घेणारा टीम साऊदी अव्वल दहामध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. या सामन्यात ९ बळी घेणारा आॅस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्क कारकिर्दीतील सर्वोत्तम ८०६ मानांकन गुणांसह पाचव्या स्थानी दाखल झाला आहे. जोश हेजलवुडने एका स्थानाची प्रगती करताना सातवे स्थान गाठले आहे.कोहलीच अव्वलआॅस्टेÑलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला विराट कोहलीला मागे टाकण्याची चांगली संधी होती. मात्र न्यूझीलंडविरुद्ध त्याला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आल्याने कोहलीचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राहिले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विराट कोहली फलंदाजीत अव्वल स्थानी कायम
विराट कोहली फलंदाजीत अव्वल स्थानी कायम
कसोटी क्रमवारी : बुमराहची सहाव्या स्थानी घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 5:04 AM