Join us  

विराट कोहली अव्वल स्थानी कायम

या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजा आहे. जडेजाला आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यातील एकाही सामन्यात खेळवण्यात आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 3:17 PM

Open in App
ठळक मुद्देचौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या चेतेश्वर पुजाराने क्रमवारीत सहावे स्थान पटकावले आहे. 

दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीनेआयसीसी कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान कायम राखले आहे. कोहलीने इंग्लंडच्या दौऱ्यात आतापर्यंत 544 धावा केल्या आहेत. त्यानुसार 937 गुणांसह विराट अव्वल स्थानावर विराजमान आहे. चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या चेतेश्वर पुजाराने क्रमवारीत सहावे स्थान पटकावले आहे. 

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चौथ्या कसोटी सामन्यात सहा बळी मिळवले होते. या कामगिरीच्या जोरावर शमीने अव्वल 20 गोलंदाजांच्या यादीत स्थान पटकावले आहे. गोलंदाजीमध्ये इंग्लंडचा जेम्स अँडरसन हा अव्वल स्थानावर कायम आहे. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजा आहे. जडेजाला आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यातील एकाही सामन्यात खेळवण्यात आलेले नाही.

टॅग्स :विराट कोहलीआयसीसीचेतेश्वर पुजारा