Join us  

दिलगिरी सोडा, विराट कोहलीने 'त्या' विधानावर दिली ही प्रतिक्रिया...

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 12:23 PM

Open in App

मुंबईः भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला. त्यात त्याने एका चाहत्याला चक्क देश सोडण्याचा सल्ला दिला. त्याची ही गोष्ट काहींना आवडली, तर अनेकांनी त्याला ट्रोल केले. व्हिडीओत कोहली मोबाईलवर काही तरी वाचताना दिसत आहे. भारतीय फलंदाजांच्या तुलनेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा खेळ अधिक आनंददायी असतो, असे एका चाहत्याने लिहिले. त्यावर कोहली म्हणाला,''तुम्ही भारतात राहू नका. तुम्हाला दुसरे देश आवडतात, मग तुम्ही आमच्या देशात का राहता?'' 

( Video : विराट कोहलीचा पारा चढला, चाहत्याला म्हणाला देश सोडून जा! )या विधानानंतर सोशल मीडियाने कोहलीला चांगलेच धारेवर धरले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही त्याच्या विधानावर नाराजी प्रकट केली. देशभर त्या विधाना विरोधात टीकेची लाट उसळत असताना कोहलीने मात्र दिलगिरी व्यक्त न करण्यावरच धन्यता मानली. त्याने या सर्व टीकांना जास्त गांभीर्याने न घेता, एक ट्विट केले.

( कोहलीला कानपिचक्या; फ्रान्सचं पाणी पितो, इटलीत लग्न करतो अन् आम्हाला देश सोडायला सांगतो) 

ट्रोल होणं, ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही. मी दिलेलं उत्तर हे सर्व भारतीय खेळाडूंवर केलेल्या कमेंटवरील होतं. यापुढे मला काहीच म्हणायचे नाही. मलाही स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे. वाद विसरा आणि दिवाळी सणाचा आंनद घ्या, असे विराटने ट्विट केलं. 

 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय