दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसी कसोटी फलंदाजांच्या मानांकनामध्ये आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनंतर दुस-या स्थानी कायम आहे तर अॅशेस मालिकेतील चौथ्या लढतीत नाबाद द्विशतकी खेळी करणाºया अॅलिस्टर कूकने नऊ स्थानांची प्रगती करताना आठव्या स्थानी झेप घेतली आहे.
मेलबोर्न व पोर्ट एलिझाबेथ कसोटी सामने संपल्यानंतर रविवारी जाहीर झालेल्या मानांकनामध्ये कुकने द्विशतकी खेळीच्या जोरावर वर्षाचा शेवट अव्वल १० खेळाडूंमध्ये स्थान राखत केला आहे. ३३ वर्षीय सलामीवीर कुकच्या नाबाद २४४ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ४९१ धावांची मजल मारली. वर्षाची सुरुवात १५ व्या स्थानावर करणारा कुक अॅशेस मालिकेत १० व्या मानांकनासह सहभागी झाला होता. कुकच्या तुलनेत १७ मानांकन गुणांची आघाडी घेत दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला सातव्या स्थानी आहे.
स्मिथने मेलबोर्न सामन्यात ७६ व नाबाद १०२ धावांची खेळी करीत अव्वल स्थान अधिक मजबूत केले. स्मिथच्या नावावर ९४७ मानांकन गुणांची नोंद असून तो भारतीय कर्णधाराच्या तुलनेत ५४ मानांकन गुणांनी आघाडीवर आहे.
मानांकनामध्ये सुधारणा करणाºया खेळाडूंमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रुटचा समावेश आहे. रुटचे चौथ्या स्थानावर असलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनप्रमाणे समान ८५५ मानांकन गुण आहेत. रुट व विलियम्सनने वर्षाची सुरुवात तिसºया व चौथ्या स्थानाने केली होती.
आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर इंग्लंडचा जो रुट आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन यांच्या तुलनेत २४ मानांकन गुणांनी पिछाडीवर असून सहाव्या स्थानी विराजमान आहे. त्याने मेलबोर्नमध्ये १०३ व ८६ धावांची खेळी करताना एकूण ३० मानांकन गुणांची कमाई केली. विशेष म्हणजे डेव्हीड वॉर्नरने २०१७ वर्षाची सुरुवात पाचव्या स्थानावरुन केली होती. (वृत्तसंस्था)
गोलंदाजांच्या मानांकनामध्ये अव्वल ९ स्थानांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन ८९२ मानांकन गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्याने वर्षाची सुरुवात सहाव्या (८१० मानांकन गुण) स्थानासह केली होती. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा व रंगना हेराथ यांनी २०१७ ची मानांकनामध्ये सुरुवात अनुक्रमे पहिल्या, दुसºया व तिसºया स्थानासह केली होती, पण वर्षाचा शेवट तिसºया, चौथ्या व सहाव्या स्थानासह केला. आॅस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड मानांकनामध्ये पाचव्या स्थानी आहे. अव्वल १० मध्ये केवळ एक बदल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मोर्ने मोर्कल १० व्या स्थानी आहे.
३३ वर्षीय या वेगवान गोलंदाजाने झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या डावात २१ धावांत पाच बळी घेतले होते. त्यामुळे त्याने रँकिंगमध्ये तीन स्थानांची प्रगती केली. जवळजवळ दोन वर्षांनंतर मोर्कलने मानांकनामध्ये प्रथमच अव्वल १० मध्ये स्थान मिळवले आहे.
मोर्कलचा संघ सहकारी केशव महाराजने झिम्बाब्वेविरुद्ध दुसºया डावात ५९ धावांत पाच बळी घेतले. त्याने कारकिर्दीत सर्वोत्तम १६ वे स्थान पटकावले.
अष्टपैलू खेळाडूंच्या मानांकनामध्ये बांगलादेशचा शाकिब अल-हसन अव्वल व अश्विन दुसºया स्थानी आहे.
Web Title: Virat Kohli retains second place, ICC Test Rankings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.