इस्लामाबाद : टी-२० प्रकारातले कर्णधारपद सोडल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विराट कोहलीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे क्रिकेटविश्वामध्ये उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज मुश्ताक अहमद याने याबाबत सांगितले की, ‘भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आता लवकरच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारू शकतो. मात्र, असे झाले तरी तो आयपीएल खेळत राहील.’ मुश्ताक पुढे म्हणाला की, ‘आयपीएलमुळेच टी-२० विश्वचषकात भारताचीची कामगिरी सुमार झाली. जास्त काळ बायोबबलमध्ये राहण्याचा परिणाम भारतीयांवर झाल्याने त्यांची कामगिरी सुमार झाली. पाकिस्तानच्या जिओ न्यूजसोबत संवाद साधताना मुश्ताक अहमदने हे वक्तव्य केले.