कोलंबो, दि. 31 - भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार विराट कोहलीने 76 चेंडूत शतक ठोकले आहे. या वन-डे सामन्यातील विराटचे हे शतक 29 आहे. त्यामुळे सर्वाधिक शतक करणा-यांच्या यादीत सनथ जयसुर्याला मागे टाकत तिस-या क्रमांवर पोहचला आहे. वन डेमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत कोहली आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग (30) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (49) हे दोनच खेळाडू आता पुढे आहेत. कोहलीने या शतकासह श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याला (28) मागे टाकले. आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दमदार शतकी फलंदाजी केली. रोहित शर्माने 88 चेंडूत 104 धावा केल्या. तर विराट कोहलीने या सामन्यात 76 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विराट कोहलीने 17 चौकार आणि दोन षटकार लगावत 96 चेंडूत 131 धावा केल्या. त्याला लसिथ मलिंगाने बाद केले.
वन डेमधील सर्वाधिक शतक...1) सचिन तेंडुलकर - 492) रिकी पॉण्टिंग - 303) विराट कोहली - 294) सनथ जयसुर्या - 28