मुंबई : इंग्लंड येथे झालेल्या विश्वचषकात कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही गेली होती. यावेळी अनुष्काच्या चहाचे कप निवड समिती सदस्य उचलत होते, असा गंभीर आरोप भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केला होता. यावर अखेर कोहलीने आपले मौन सोडले आहे.
इंजिनिअर यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सांगितले होते की, " विश्वचषक पाहायला मी गेलो होतो. तिथे काही व्यक्ती अनुष्का शर्माचे चहाचे कप उचलत होते. या व्यक्ती कोण होत्या हे मला माहिती नव्हते. पण कालांतराने या व्यक्ती भारताच्या राष्ट्रीय निवड समितीमधील सदस्य असल्याचे समजले."
ते पुढे म्हणाले होते की, " हा प्रकार निंदनीय असाच होता. पण जर असे प्रकार थांबवायचे असतील तर माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरसारखे खेळाडू निवड समितीमध्ये असायला हवे."
यावर कोहली म्हणाला की, " श्रीलंकेविरुद्धच्या विश्वचषकातील सामन्यात अनुष्का स्टेडियममध्ये आली होती. तिच्याबरोबर तिचे फ्रेंड्स होते. पण ती जिथे बसली होती तिथे निवड समिती सदस्या नव्हते. कारण त्यांची आसन व्यवस्था दुसरीकडे होते. त्यामुळे असे घडलेले नाही. जर एखाद्याला निवड समितीवर टीका करायची असेल तर त्यांनी ती करावी, पण त्यामध्ये अनुष्काला ओढण्याचे काहीच कारण नव्हते."
अनुष्का शर्मा भडकली; 'त्या' गंभीर विषयावर अखेर सोडले मौनभारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सध्याच्या घडीला भलतीच भडकलेली दिसत आहे. काही गंभीर आरोप करण्यात आले होते, यावर आता अनुष्काने मौन सोडले आहे.
आतापर्यंत अनुष्का बऱ्याचदा ट्रोल झाली आहे. विराटबरोबर फिरताना अनुष्काला बऱ्याचदा ट्रोल केले गेले आहे. त्याचबरोबर अनुष्का ही विराटसाठी अनलकी असल्याचेही म्हटले गेले आहे. पण आतापर्यंत या सर्व विषयांवर अनुष्का काहीच बोलली नव्हती. पण आता नेमकं असं काय घडलंय की, अनुष्का भडकलेली पाहायला मिळाली.
अनुष्का ही विराटबरोबर बऱ्याच स्पर्धांना उपस्थिती लावते. अनुष्का इंग्लंडमध्ये झालेला विश्वचषक पाहायलाही गेली होती. यावेळी अनुष्काचा पाहुणचार निवड समितीचे सदस्य करत होते. अनुष्काला चहा देणे, तिचे चहाचे कप उचलणे, असे प्रकार निवड समितीमधील सदस्य करत होते, असा खळबळजनक खुलासा भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केला होता. यावर अनुष्का भडकलेली पाहायला मिळाली.
अनुष्काने याबाबत एक ट्विट केले आहे. यामध्ये अनुष्काने लिहिले आहे की, " या आरोपांमध्ये काहीही सत्य नाही. मी इंग्लंडमध्ये सामना पाहायला गेले होते. पण तेव्हा माझ्याबरोबर एकही निवड समितीचे सदस्य नव्हते. मी कुटुंबियांच्या स्टँडमध्ये बसली होती. त्यामुळे या आरोपांचा काहीही संबंध नाही. जर तुम्हाला निवड समितीवर टीका करायची असेल तरमला त्यामध्ये का ओढत आहात."