Join us  

Virat Kohli: ‘त्याच्या खेळीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही’, CSkचा स्टार खेळाडू विराटच्या पाठिशी

Virat Kohli: माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या सर्वात खराब फेजमधून जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याची ढिसाळ कामगिरी चर्चेचा विषय बनली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 5:43 PM

Open in App

Virat Kohli: माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या सर्वात खराब फेजमधून जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याची ढिसाळ कामगिरी चर्चेचा विषय बनली आहे. अडीच वर्षांपासून विराट एकही शतक मारू शकला नाही. त्यामुळे आता त्याच्या संघातील स्थानावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पण, अशा परिस्थितीमध्येही विराटचे आजी-माजी सहकारी त्याच्या पाठिशी उभे आहेत. 

'...कोणालाही अधिकार नाही'चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज रॉबिन उथप्पाने(Robin Uthappa)ही उघडपणे विराट कोहलीचे समर्थन केले आहे. रॉबिन उथप्पा म्हणतो की, 'विराट कोहलीने यापूर्वी ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, त्यावरुन त्याच्या संघातील स्थानावर शंका घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. विराटने कसे खेळायचे हे सांगण्याचाही अधिकार कोणाला नाही. तो विश्रांती घेऊन दमदार कमबॅक करेल.'

'तो आणखी 30-35 शतके ठोकेल'रॉबिन उथप्पा पुढे म्हणतो की, 'विराट कोहलीने आपल्या तंत्र आणि क्षमतेच्या जोरावर 70 शतके ठोकली आहेत. त्याच्यामध्ये अजून भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. तो आणखी 30-35 शतके ठोकू शकतो. जेव्हा विराट धावा काढत होता, शतकावर शतक झळकावत होता, तेव्हा त्याच्या खेळावर कोणी प्रश्न उपस्थित केले नव्हते. आता त्याला शिकवण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्याला खेळू द्या, खेळाचा आनंद घेऊ द्या,' असेही उथप्पा म्हणाला.

टॅग्स :विराट कोहलीऑफ द फिल्डभारतीय क्रिकेट संघ
Open in App