Join us  

विराट कोहली, रोहित शर्मा यांची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा अन् अजित आगरकर.... 

T20 World Cup 2024 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 2:15 PM

Open in App

T20 World Cup 2024   (Marathi News) :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून जरी हार पत्करावी लागली असली तरी संपूर्ण स्पर्धेत यजमानांनी वर्चस्व राखले होते. आता जून २०२४ मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. त्यापूर्वी आता टीम इंडियाला जानेवारीत अफगाणिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळायची आहे. त्यानंतर आयपीएल २०२४ आहे. यातील खेळाडूंची कामगिरी पाहून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे.  

पण टीम इंडियाची सर्वात मोठी चिंता रोहित शर्मा आणि विराट कोहली आहेत. रोहित आणि विराट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाचा भाग असतील की नाही हे चाहत्यांना समजू शकत नाही कारण हे दोघंही २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर एकही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही. रोहित आणि विराट अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळणार का, असाही प्रश्न समोर आहेच. याबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय संघाचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर दक्षिण आफ्रिकेला पोहोचले असून तेथे ते रोहित आणि विराटसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली २०२४ मध्ये होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळू इच्छित आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात न्यूलँड्सच्या मैदानावर दुसरी कसोटी खेळली जात आहे. अजित आगरकरही या दोन खेळाडूंच्या भेटीसाठी केपटाऊनला पोहोचले आहेत. अजित आगरकर यांच्यासह शिव सुंदर दास, सलील अंकोला हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगरकर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशीही चर्चा करणार असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत रोहित आणि विराट सहभागी होण्याचीही शक्यता आहे. 

मात्र, या मालिकेनंतर वर्ल्ड कपसाठी रोहित व विराट यांच्या फॉर्म आणि फिटनेसवर निवड आधारित असेल. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, आयपीएल दरम्यान ३० भारतीय खेळाडूंवर नजर ठेवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असून दोघेही अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर आहेत.  

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024