Virat Kohli Rohit Sharma, IPL 2022: भारतीय क्रिकेट संघामधील (Team India) दोन दिग्गज फलंदाज म्हणजे माजी कर्णधार विराट कोहली आणि विद्यमान कर्णधार रोहित शर्मा. सध्या सुरू असलेल्या IPL मध्ये विराट कोहली RCB कडून केवळ फलंदाज म्हणून खेळतोय. तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून मैदानात उतरतो आहे. परंतु, IPL मध्ये दोन्ही खेळाडूंची कामगिरी निराशाजनक आहे. दोघांनाही आतापर्यंत फलंदाजीत आपली छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघातून खेळताना संघाचं कसं होणार? असा सवाल काही दिवसांपासून विचारला जात होता. पण, हे वाईट दिवस जातील आणि चांगले दिवस येतील, असा आशावाद व्यक्त करत नेटकरी व चाहते तसेच क्रिकेट जाणकार या दोघांना पाठिंबा देताना दिसत आहेत. पाहूया काही निवडक ट्वीट्स-
--
--
--
--
--
--
--
--
विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी- विराटने खेळलेल्या ८ सामन्यात त्याला १७च्या सरासरीने केवळ ११९ धावाच करता आल्या आहेत. यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही. त्याने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली आहे. तसेच, गेल्या दोन सामन्यात तर तो पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला आहे.
रोहित शर्माची आतापर्यंतची कामगिरी- रोहित शर्माने आतापर्यंत सात पैकी एकाही सामन्यात अर्धशतक झळकावलेले नाही. रोहितने ७ सामन्यात १६च्या सरासरीने ११४ धावा केल्या आहेत. तर ४१ ही त्याची सर्वाधिक खेळी आहे. कर्णधार म्हणूनही रोहितला आपल्या संघाला एकही सामना जिंकवून देता आलेला नाही.