विराट Yo Yo टेस्टमध्ये टॉपर; रोहित, हार्दिकचाही रिझल्ट लागला, KL Rahulने नाही दिली परीक्षा 

आशिया चषक २०२३ स्पर्धा जवळ आली आहे आणि भारतीय क्रिकेट संघ बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये शिबिरात व्यस्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 12:36 PM2023-08-25T12:36:15+5:302023-08-25T12:37:32+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli, Rohit Sharma & Hardik Pandya ace Yo-Yo Test ahead of Asia Cup 2023, KL Rahul left out | विराट Yo Yo टेस्टमध्ये टॉपर; रोहित, हार्दिकचाही रिझल्ट लागला, KL Rahulने नाही दिली परीक्षा 

विराट Yo Yo टेस्टमध्ये टॉपर; रोहित, हार्दिकचाही रिझल्ट लागला, KL Rahulने नाही दिली परीक्षा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आशिया चषक २०२३ स्पर्धा जवळ आली आहे आणि भारतीय क्रिकेट संघ बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये शिबिरात व्यस्त आहे. १७ पैकी १४ खेळाडू या शिबिरात सहभागी झाले आहेत आणि आयर्लंड दौऱ्यावरून ३ खेळाडू लवकरच बंगळुरू येथे पोहोचतील. या सर्व खेळाडूंची Yo Yo Test घेतली गेली. विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि अन्य खेळाडू या चाचणीत उत्तीर्ण झाले आहेत. पण केएल राहुल, ज्याचा फिटनेस हा मुख्य चिंतेचा विषय आहे, त्याने Yo Yo Test मध्ये भाग घेतला नाही.

Asia Cup पूर्वी विराट कोहलीने गोपनीय बाब सार्वजनिक केली, BCCI ला ही कृती नाही आवडली, त्यांनी...

भारतीय खेळाडू NCA मधील सहा दिवसांच्या strength आणि कंडिशनिंग शिबिराचा भाग आहेत. बीसीसीआयचे फिटनेस पॅरामीटरनुसार खेळाडूंना १६.५ गुण मिळवणे गरजेचे आहे आणि विराट सर्वाधिक १७.२ गुण मिळवले.  कोहली व्यतिरिक्त, कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यासह इतरांनी येथील KSCA-अलूर मैदानावरील टेस्टमध्ये भाग घेतला आणि पास झाले. “चाचण्या यशस्वी झाल्या आहेत आणि अहवाल लवकरच बीसीसीआयला पाठवला जाईल,” असे सूत्राने पीटीआयला सांगितले. 

जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा शुक्रवारी अलूर येथील शिबिरात सहभागी होणार आहेत. हे चार खेळाडू आयर्लंडमध्ये ३ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळलेल्या भारतीय संघाचे सदस्य होते. या खेळाडूंचा विश्रांतीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. आयर्लंडमधून परत आलेल्यांना यो-यो चाचणी अंतर्गत ठेवले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले गेले आहे. 


तथापि, केएल राहुलच्या प्रगतीचे संघ व्यवस्थापन उत्सुकतेने पालन करेल. राहुल देखील फिटनेस ड्रिलचा भाग होता परंतु त्याचा यो-यो चाचणीमध्ये समावेश नव्हता. राहुलला भारताच्या आशिया चषक संघात सशर्त स्थान देण्यात आले आहे, कारण मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले की यष्टीरक्षक-फलंदाजाला थोडी दुखापत आहे, परंतु त्याचा पूर्वीच्या दुखापतीशी संबंध नाही. आशिया चषक संघात राखीव खेळाडू म्हणून संजू सॅमसनला स्थान देण्यात आले आहे.   

Web Title: Virat Kohli, Rohit Sharma & Hardik Pandya ace Yo-Yo Test ahead of Asia Cup 2023, KL Rahul left out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.