गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः टीम इंडियाने ट्वेंटी-20 मालिकेत निर्भेळ यश मिळवले. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजवर सात विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिका 3-0 अशी खिशात घातली. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका अंध चाहत्याची भेट घेतली. लेरॉय असे त्याचे नाव असून या तिघांनी चाहत्याचा दिवस स्पेशन बनवला.
कोहलीच्या निशाण्यावर जावेद मियाँदादचा विक्रम, गांगुलीलाही टाकू शकतो मागे
भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत वर्चस्व गाजवले. अखेरच्या सामन्यात रिषभ पंत आणि दीपक चहर यांनी दमदार कामगिरी केली. कर्णधार कोहलीनेही 45 चेंडूंत 59 धावांची खेळी केली. त्याला रिषभने 42 चेंडूंत 65 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 147 धावांचे आव्हान सहज ओलांडले. चरहने 4 धावांत 3 विकेट घेतल्या. या सामन्यानंतर कोहली, रोहित आणि शास्त्री यांनी लेरॉयशी गप्पा मारल्या.
बीसीसीआयचं चॅलेंज; शिखर धवन, श्रेयस अय्यरची 'बोबडी वळली'!
भारतीय संघाचा जबरा फॅन असलेल्या लेरॉयनं यावेळी कोहलीशी भरपूर गप्पा मारल्या. कोहलीची आक्रमक फलंदाजी आवडत असल्याचे लेरॉयनं सांगितले. वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंतर दुःख झाल्याचे लेरॉयने सांगितले.
भारत-विंडीज वन डे मालिका आजपासून, जाणून घ्या सामने कधी व कोठे!गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना येथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत भारतीय संघात केदार जाधव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी हे परतणार आहेत. पण, अजूनही भारतीय संघाला मधल्या फळीसाठीचा सक्षम पर्याय शोधता आलेला नाही. याही मालिकेत चौथ्या स्थानासाठी संघात प्रयोग होताना पाहायला मिळाल्यास नवल वाटायला नको.
वन डेसाठी भारतीय संघ - विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी
वन डेसाठी वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, ख्रिस गेल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शे होप, जेसन होल्डर ( कर्णधार) केमार रोच.
वन डे मालिका8 ऑगस्ट, पहिला सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, सायंकाळी 7 वा. पासून11 ऑगस्ट, दुसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून14 ऑगस्ट, तिसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून
थेट प्रक्षेपण - Sony 1/HD आणि 3/HD, SonyLIV