लॉकडाऊनच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने स्थगित करण्यात आले असले तरी जागभरात भारतीय क्रिकेटपटूंची हवा असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. टीम इंडियाचा 31 वर्षीय कर्णधार विराट कोहली या क्रमवारीत अव्वल, तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. अभ्यासातून समोर आलेली आकडेवारी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
गरूडाच्या पंखांखाली दडलंय कोण? वन अधिकाऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधता सापडेना
लॉकडाऊनच्या काळात SEMrushनं केलेल्या अभ्यासात सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये कोहली अव्वल स्थानावर आहे. जानेवारी ते जून या कालावधीत प्रती महिना सरासरी 16.2 लाख वेळा कोहलीच्या नाव सर्च केलं गेलं. याच कालावधीत टीम इंडियाची सरासरी 2.4 लाख इतकी होती. टॉप टेन क्रिकेपटूंमध्ये रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, जॉर्ज मॅकाय, जोश रिचर्डस, हार्दिक पांड्या, सचिन तेंडुलकर, ख्रिस मॅथ्यूज आणि श्रेयस अय्यर यांना सरासरी प्रती महिना अनुक्रमे 9.7, 9.4, 9.1, 7.1, 6.7, 5.4, 4.1 आणि 3.4 लोकांनी सर्च केलं.
संघांमध्ये टीम इंडियानं अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्या नावाला अनुक्रमे .66, .33, .29, .23, .16, .12, .12, .09, .05, .04 आणि .03 लाख लोकांनी सर्च केलं. टॉप टेनमध्ये एकही महिला क्रिकेटपटू नसली तरी स्मृती मानधना आणि एलिसा पेरी यांनी अनुक्रमे 12 आणि 20 वं स्थान पटकावलं आहे.
''या अभ्यासातून समोर आलेल्या आकडेवारीचं आम्हाला अजिबात आश्चर्य वाटत नाही. क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीनं अव्वल स्थान पटकावलं आहे आणि भारतीय संघाबाबत सर्वाधिक सर्च केलं गेलं,''असे SEMrush चे मुख्य अधिकारी फर्नांडो अँगुलो यांनी सांगितले.
बाबोss... 18 कॅरेट सोनं, 3600 हिरे; तयार होतोय 11 कोटींचा शाही 'मास्क'!
हसीन जहाँनं मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत, म्हणाली...
IPL 2020 होणार आत्मनिर्भर!; बाबा रामदेव यांची कंपनी 'पतंजली' उतरली टायटल स्पॉन्सर्सच्या शर्यतीत
टीम इंडियातील आणखी एक सदस्य पॉझिटिव्ह; एकूण सहा जणांना कोरोना