विराट कोहली, एमएस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघेही भारताचे दिग्गज खेळाडू आहेत. मात्र, अनेक वेळा भारतात सर्वाधिक चाहते कुणाचे? अशी चर्चा यांच्या अथवा क्रिकेट चाहत्यांमध्ये होताना दिसते. मात्र आता, एका सर्वेक्षणातून या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सर्वेक्षणाचा निकाल खरोखरच चकित करणारा आहे. तर जाणून घेऊयात या सर्वेक्षणात काय म्हणतायत लोक...
इंडिया टुडे-सी-व्होटरने भारतातील सर्वात आवडत्या खेळाडूसंदर्भात मूड ऑफ द नेशन (MOTN) सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाचा कालावधी 2 जानेवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 असा आहे. यात भारतातील सर्वच्या सर्व 543 लोकसभा मतदारसंघांमधील 54,418 लोकांसोबत चर्चा करण्यात आली. याशिवाय सी-व्होटरने गेल्या 24 आठवड्यादरम्यान 70,705 लोकांचे मतही जाणून घेतले. अर्थात सर्वेक्षणाचा अहवाल तयार करण्यासाठी एकूण 1 लाख 25 हजार 123 लोकांच्या मतांचे विश्लेषण करण्यात आले.
कोहली सर्वाधिक आवडता खेळाडू -
या सर्वेक्षणात विराट कोहलीचे नाव सर्वात वर आहे, अर्थात विराट कोहली हा भारतातील सर्वात आवडता खेळाडू आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी. यानंतर, रोहित शर्मा यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, तर शुभमन गिल चौथ्या आणि टीम इंडियाचा सध्याचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव पाचव्या स्थानावर आहे.
या शिवाय, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला भारतातील सर्वाधिक पसंतीचा अॅथलिट म्हणून निवडण्यात आले आहे. २०२० च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये नीरजने सुवर्णपदक जिंकले आहे. यानंतर, नीरज चोप्राने २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकले. याशिवाय नीरज चोप्राने अनेक स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंचावले आहे.
Web Title: Virat Kohli, S Dhoni or Rohit Sharma, who is India's most favourite player You will be surprised to see the survey
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.