Join us  

विराट म्हणतो, मी देशासाठी खेळतोय, कोणावर उपकार करत नाही!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात दहा हजार धावांचा पल्ला पार करून अनेक विक्रमांची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 2:05 PM

Open in App

विशाखापट्टणम : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात दहा हजार धावांचा पल्ला पार करून अनेक विक्रमांची नोंद केली. त्याच्या या खेळीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला. यशाचे हे शिखर पादाक्रांत केल्यानंतर कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे, परंतु त्याला यात काही विशेष वाटत नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) दिलेल्या विशेष मुलाखतीत त्याने दिलखुलास गप्पा मारल्या. कोहली म्हणाला,''देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची बाब आहे. दहा वर्ष देशाचे प्रतिनिधित्व केल्यानंतरही मी काही विशेष केले आहे, असे वाटत नाही. आताही मला आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रत्येक धावांसाठी कठोर मेहनत घ्यावी लागत आहेच. अनेक जण देशाचे प्रतिनिधित्व करू इच्छितात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्यात धावांची भूक कायम असायला हवी. कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही, त्यासाठी परिश्रम घ्यावेच लागतात.''

SPECIAL: India captain @imVkohli speaks about scaling mount 10K and why the team will always hold prime importance before personal milestones. DO NOT MISS THIS - by @Moulinparikh#TeamIndia#INDvWIInterview Link 📽️ 👉 - https://t.co/IFmGUsG6uBpic.twitter.com/aWlyUNSbjz— BCCI (@BCCI) October 25, 2018

संघाप्रती एकनिष्ठा कायम असायला हवी असे मत कोहलीने व्यक्त केले. ''मला एका षटकात सहा वेळा ड्राईव्ह मारायला लागला, तरीही मी ते करेन. ते माझे कर्तव्य आहे आणि त्यासाठीच मला संघात निवडले आहे. तो माझ्या कामाचा भाग आहे. त्यामुळे मी तसे करुन कोणावर उपकार करत नाही,''असे त्याने सांगितले.

INTERVIEW: I’ll dive six times in an over for my team: @imVkohli tells @MoulinparikhRead the full interview here ▶️ https://t.co/NBEmdSWu8i#INDvWIpic.twitter.com/uNCtgQyIhL— BCCI (@BCCI) October 26, 2018

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज